लोकमत न्यूज नेटवर्कअंबड : धनगर समाजाने आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलने सुरु केली असून, शनिवारी अंबड शहरात आंदोलनकर्त्यांनी दगडफेक करुन शहर बंद केले. तसेच जालना - बीड रस्ता बंद करुन बसस्थानकासमोर टायर पेटविले. दरम्यान, या प्रकरणी अंबड पोलिसांनी २२ जणांना अटक केली. त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयाने त्यांना जामीन दिला.धनगर समाजाला एस.टी. प्रवर्गाचे आरक्षण मिळावे, या मागणीसाठी पैठण तालुक्यातील बाळानगर येथील तरुणाने शुक्रवारी आत्महत्या केल्याची घटना घडली. ही माहिती सोशल मीडियाव्दारे शहरात पसरली. त्यानंतर धनगर समाज संघटनांनी शनिवारी शहरात बंद पुकारला. मात्र, याची शहरातील व्यापारांना महिती नसल्याने व्यापाऱ्यांनी नेहमी प्रमाणे आपली दुकाने सुरु ठेवली. धनगर सामाजिक संघटनांच्या कार्यकर्त्यांनी बाजारपेठेत फिरुन दुकाने बंद करण्याचे आवाहन केले. या आवाहनास प्रतिसादेत शहरातील दुकाने बंद केली. मात्र या दरम्यानच काही समाजकंटकांनी शहरातील दुकानांवर दगडफेक करण्यास सुरुवात केली. तर काहींनी शहराचा मुख्य मार्ग असणाºया जालना-बीड रोडवर टायर पेटवून रस्ता बंद केला. तसेच मत्स्योदरी देवी मंदीरापासून धनगर समाजाच्या मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात आला.
धनगर समाजाचे आंदोलन पेटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 05, 2018 12:40 AM