लोकमत न्यूज नेटवर्करांजणी : घनसावंगी तालुक्यातील चित्रवडगाव येथील जि. प. शाळेतील शिक्षकाचे एक पद अधिकचे असून एका शिक्षिकेची तालुक्यात इतरत्र बदली करावी, असे आदेश मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. नीमा अरोरा यांनी काही दिवसांपूर्वी दिले होते.यामुळे बुधवारी केंद्र प्रमुखांनी त्या शिक्षिकेला कार्यमुक्त केल्याने ग्रामस्थांनी शाळेला कुलूप ठोकून घटनेचा निषेध व्यक्त करून मुख्याध्यापकांना निवेदन दिले आहे.येथे पहिली ते पाचवी पर्यंतचे वर्ग आहेत. यात ११२ विद्यार्थी ज्ञानार्जन करित आहेत. प्रत्येक वर्गाला एक शिक्षक असावा, या मागणीसाठी शाळा बंद करण्यात आल्याचे पालकांनी सांगितले.यावेळी ज्ञानेश्वर सांगळे, विलास सोसे, अनिल सोसे, भागवत सोसे, संतोष सोसे आदींची उपस्थिती होती.
जि. प. शाळेला ठोकले कुलूप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 01, 2019 12:51 AM