लोकमत न्यूज नेटवर्कजालना : धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा येथे अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार करणा-या संशयितांना फाशीची शिक्षा द्यावी, या मागणीसाठी सोमवारी सकल तेली समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. मोर्चेक-यांनी आपल्या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी शिवाजीराव जोंधळे यांना दिले.सकाळी अकराच्या सुमारास शासकीय विश्रामगृहासमोरून या मोर्चास सुरुवात झाली. मोर्चात महिलांची संख्या लक्षणीय होती. मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालया समोर पोहचल्यानंतर पोलिसांनी मोर्चे क-यांना मुख्य प्रवेशद्वारावरच रोखले. या वेळी सकल तेजी समाजाच्या एका शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे यांची भेट घेवून निवेदन दिले. धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा येथे पाच वर्षाच्या बालिकेवर एका संशयितांने अत्याचार केला. ही घटना माणुसकीला काळिमा फासणारी असून, यामुळे समस्त तेली समाजाच्या भावना दुखावल्या आहेत. समाजातील अशा विकृती नष्ट करण्यासाठी या घटनेतील दोषीवर कोपर्डी प्रमाणे जलदगती न्यायालयात खटला चालवून फाशीची शिक्षा द्यावी. तसेच पीडितेच्या आई-वडिलांना धाक दाखवून प्रकरण मिटविणा-यांवरही कारवाई करावी, अशी मागण्ी केली. निवेदनावर तेली समाजाचे लक्ष्मीकांत पांगारकर, राजेश नरवैय्ये, विश्वनाथ क्षीरसागर, पद्मनाथ क्षीरसागर, राजेंद्र वाघमारे, सुनंदा अबोले, संजय चौधरी, अनिल व्यवहारे, कै लास सोनवणे, बाबुराव भवर, रामराव गडगिळे, प्रभाकर गडगिळे, प्रमोद गडगिळे, कृष्णा ठोंबरे, योगेश गडगिळे, राहुल धारकर, कैलास बुजाडे, अशोक पांगारकर, दत्ता भवर मनोज मालोदे, मनोज गडगिळे, संजय राऊत, गणेशराव शिंदे, अर्जुन मालोदे, पवन मालोदे आदींच्या स्वाक्ष-या आहेत.
सकल तेली समाजाचा जिल्हा कचेरीवर मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2018 12:50 AM