लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जिल्ह्यात भीषण दुष्काळी परिस्थिती आहे. याबाबत मागील जि. प. च्या सभांमध्ये अधिका-यांना दुष्काळाचे नियोजन करण्याचे आदेश जि.प. अध्यक्षांनी दिले होेते. परंतु, अद्यापही अधिका-यांनी पाहिजे तसे दुष्काळाचे नियोजन न केल्याने सदस्यांनी अधिका-यांना शुक्रवारी झालेल्या स्थायी समितीच्या सभेत धारेवर धरले. तसेच निधी वाटपाच्या मुद्यावरुन सभेत गोंधळ उडाला.याप्रसंगी जि.प. अध्यक्ष अनिरुध्द खोतकर, उपाध्यक्ष सतीश टोपे, अतिरिक्त मुख्य अधिकारी देशमुख, अतिरिक्त मुख्य अधिकारी सुरेश बेदमुथा, वित्त अधिकारी चव्हाण यांच्यासह सर्व सभापती व सदस्यांची प्रमुख उपस्थिती होती.सभेची सुरुवात राष्ट्रगीताने करण्यात आली. सुरुवातीलाच सदस्य राहुल लोणीकर यांनी दुष्काळाचा मुद्दा उपस्थित केला. सध्या जिल्ह्यात रोजगार हमी योजनेची कामे सुरु आहे. परंतु, ती कामे अत्यंत कासव गतीने सुरु असून, या कामांना अधिकारी वेग देत नाही. तसेच इतरही कामे होत नाही. त्यामुळे येणाºया काळात नागरिक मोठ्या प्रमाणात स्थलांतरीत होऊ शकतात. दुष्काळातही अधिकारी कामचुकारपणा करीत असेल तर अशा अधिकाºयांवर कडक कारवाई करावी करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली. यावर उत्तर देतांना अध्यक्ष म्हणाले की, जे अधिकारी दुष्काळात कामचुकारपणा करीत आहे. त्यांच्यावर कडक करावी करण्यात येईल. जर अधिकाºयांना दुष्काळात काम करण्याची इच्छा नसेल तर त्यांनी रजेवर जावे किंवा आपली बदली करुन घ्यावी, असेही अध्यक्ष म्हणाले.सदस्य जयमंगल जाधव यांनी दलित वस्तीचा अखर्चीत निधी व बीडीओंच्या मनमानी कारभारवरुन बीडीओंना धारेवर धरले. ते म्हणाले की, जालना पंचायत समिती सोडून एकाही पंचायत समितीने दलित वस्तीचा निधी खर्च केला नाही. तसेच जालना पंचायत समितीचे बीडीओ हे सदस्यांना योग्य माहिती देत नाही. जालना पंचायत समितीने अद्यापही रोजगार हमी योजनेची कामे सुरु केली नाही. याबाबत त्यांच्याविरुध्द अनेंक तक्रारी आल्या आहे. त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी जयमंगल जाधव यांनी केली.त्यानंतर निधी वाटपावरुन भाजपच्या सदस्यांनी नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले की, सर्व सदस्यांना योग्य निधी देण्यात यावा. कमी प्रमाणात निधी आला की, आम्हाला कामे करता येत नाही.यावरुनच सदस्य शालिकराम म्हस्के व उपाध्यक्ष टोपे यांच्यामध्ये बाचाबाची झाली. या सभेस सर्व सभापती, सदस्य, सर्व विभागाचे अधिकारी व पचायंत समितीचे बीडीओंची उपस्थिती होती.५० टक्के अधिकारी अनुपस्थितशुक्रवारी झालेल्या सभेत मुख्य कार्यकारी अधिकाºयांसह ५० टक्के अधिकाºयांची अनुपस्थिती होती. अनुपस्थित अधिकाºयांवर कारवाई करण्याची मागणी सदस्यांनी केली. सदस्य शालीकराम म्हस्के म्हणाले की, मागील सभेतही अधिकाºयांची उपस्थिती नव्हती. या सभेतर ५० टक्के अधिकाºयांनी दांडी मारली. या अधिकाºयांवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली. यावर उत्तर देतांना अध्यक्ष खोतकर म्हणाले की, अनुपस्थित अधिकाºयांना नोटीसा पाठविण्यात येतील.
जालना जि.प.सभेत निधी वाटपावरुन गोंधळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2018 12:25 AM
जिल्ह्यात भीषण दुष्काळी परिस्थिती आहे. याबाबत मागील जि. प. च्या सभांमध्ये अधिका-यांना दुष्काळाचे नियोजन करण्याचे आदेश जि.प. अध्यक्षांनी दिले होेते. परंतु, अद्यापही अधिका-यांनी पाहिजे तसे दुष्काळाचे नियोजन न केल्याने सदस्यांनी अधिका-यांना शुक्रवारी झालेल्या स्थायी समितीच्या सभेत धारेवर धरले.
ठळक मुद्देसदस्यांनी अधिकाऱ्यांना धरले धारेवर : जि.प. प्रशासनाचे दुष्काळातही ढिसाळ नियोजनाने सदस्य संतप्त