लोकमत न्यूज नेटवर्कजालना : सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियानांतर्गत जलवाहिनी अंथरण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. सदरील काम करताना संबंधित एजन्सीकडून रामनगर, कादराबाद आदींचा एकच विभाग दाखविण्यात आलेला आहे. या व अशा तांत्रिक बाबी दूर करुन योजनेची अंमलबजावणी करण्याची मागणी नगराध्यक्ष राजेश राऊत यांनी मुख्याधिकारी संतोष खांडेकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.शहरातील ही योजना डिसेंंबर २०१८ पर्यंत पूर्ण होण्याबाबत साशंकता व्यक्त करत एजन्सीने डीपीआर तयार करताना १६ झोन तयार केले आहेत. परंतु प्रत्येक झोनच्या नकाशामध्ये लॅण्डमार्क दर्शविलेला नाही. बसस्थानक, राऊतनगर, गोपीकिशन नगर, मामाचौक, सिंधी बाजार या भागांचा उल्लेख नाही. त्यामुळे नकाशामधील लाईन समजण्यास अडचण निर्माण होत आहे.प्रत्येक भागात काम करताना संबंधित नगरसेवकाला विश्वासात घेऊनच काम करण्याचे आदेश एजन्सीला देण्याची मागणी निवेदना केली आहे.
विभागनिहाय जलवाहिनी अंथरावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2018 1:17 AM