लोकमत न्यूज नेटवर्कजालना : केंद्र सरकारने किसान सन्मान योजनेत आता जवळपास सर्व शेतकऱ्यांना समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे त्याच्या याद्या अद्ययावत करून त्या आॅनलाइन पाठवायच्या आहेत. जालना जिल्ह्यात साधारपणे तीन लाख ७५ हजार शेतकरी या योजनेसाठी पात्र असून, तालुका निहाय पात्र शेतकऱ्यांची यादी तयार करण्याचे काम सुरू आहे.या कामात दिरंगाई केल्यास संबंधित विभागागतील अधिकारी, कर्मचा-यावंर कारवाई करण्यात येईल असे निर्देश जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी सोमवारी अंबड आणि जालन्यात घेतलेल्या आढावा बैठकीत दिले आहेत.जालना जिल्ह्यात जवळपास तीन लाख ७५ हजारपेक्षा अधिक शेतकरी आता नव्याने जाहीर केलेल्या याजनेनुसार पात्र ठरण्याचे संकेत आहेत. त्यामुळे या सर्व शेतक-यांचे बँक खाते, आधार कार्ड क्रमांक, संबंधित बँकेचा आयएफसी कोड, परिवारातील सदस्यांची संख्याआदी सर्व माहिती ही ग्रामसेवक, तलाठी तसेच कृषी सहाय्यक यांच्या मदतीने घेणे सुरू आहे. आता पर्यंत केवळ दीड लाख शेतक-यांची यादी अद्यावत झाली आहे. आणखी ५० टक्के काम शिल्लक आहे.
‘किसान सन्मानमध्ये दिरंगाई नको’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 02, 2019 1:29 AM