लोकमत न्यूज नेटवर्कजालना : समृद्धी महामार्ग बाजूला ठेवा, अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक उशिरा बांधा, वेळ पडली तर आणखी कर्ज काढा. पण गारपीटग्रस्त शेतक-यांना वाºयावर न सोडता तातडीने भरीव मदत करा, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते बाळा नांदगावकर यांनी केली.गारपिटीमुळे नुकसान झालेल्या तालुक्यातील काही गावांत रविवारी सकाळी पाहणी केल्यानंतर त्यांनी येथील शासकीय विश्रामगृहात घेतलेल्या पत्रकार परिषदेत सरकाच्या धोरणांवर टीका केली. ते म्हणाले, गारपिटीमुळे द्राक्ष बागायतदार शेतकºयांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. या भागाचे तात्काळ पंचनामे करून शासन नुकसान भरपाई देईल, अशी अपेक्षा होती. मात्र, अद्यापही पंचनामे पूर्ण झालेले नाही. सरकारने शेतकºयांना तातडीने सरसकट मदत करावी, मृत शेतकºयांच्या कुटुंबियांना शासकीय नोकरीत सामावून घ्यावे, अशी मागणी त्यांनी केली. हल्लाबोल केवळ दाखविण्यासाठी केला जात असल्याची टीका त्यांनी केली. यावेळी मनसेचे राज्य उपाध्यक्ष अशोक तावरे, औरंगाबाद जिल्हाध्यक्ष भास्कर गाडेकर, जालना जिल्हाध्यक्ष गजानन गिते, संतोष नागरगोजे, प्रा. अंकुश जाधव, राजेंद्र गापट उपस्थित होते.काँग्रेसला अनुकूल वातावरणभाजप सरकारने सर्वसामान्यांचा अपेक्षाभंग केला असून, सध्याचे वातवारण सत्ताधाºयांविरोधात आहे. येणाºया निवडणुकांमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना सर्व ठिकाणांहून लढणार आहे. सध्या राष्ट्रवादीला नव्हे तर काँग्रेसला अनुकूल वातावरण दिसत आहे. शिवसेनेसोबत युती करणार का ? या प्रश्नाला त्यांनी बगल दिली.शिंदे कुटुंबियांची घेतली भेटगारपिटीमुळे मृत झालेल्या वंजारउमद्र येथील नामदेव शिंदे यांच्या कुटुंबियांची नांदगावकर व मनसे पदाधिकाºयांनी सकाळी भेट घेवून दिलासा दिला. धावेडी, थार येथील कैलास जाधव, मल्हारी पठाडे, विलास पठाडे या शेतकºयाच्या नुकसानीची त्यांनी पाहणी केली.
...पण शेतक-यांना वा-यावर सोडू नका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2018 12:34 AM
समृद्धी महामार्ग बाजूला ठेवा, अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक उशिरा बांधा, वेळ पडली तर आणखी कर्ज काढा. पण गारपीटग्रस्त शेतक-यांना वाºयावर न सोडता तातडीने भरीव मदत करा, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते बाळा नांदगावकर यांनी केली.
ठळक मुद्देनांदगावकर : जालना जिल्ह्यातील गारपीटग्रस्त भागाची पाहणी