भाजप - शिवसेनेच्या भूलथापांना जुमानू नका- कैलास गोरंट्याल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2019 12:35 AM2019-04-17T00:35:15+5:302019-04-17T00:35:32+5:30
काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला निवडून द्यावे असे आवाहन काँग्रेसचे माजी आ. कैलास गोरंट्याल यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : भाजप आणि शिवसेना हे दोन्हीही पक्ष जातीयवादी आहेत. त्यांच्या भूलथापांना बळी न पडता मतदारांनी धर्मनिरपेक्षेला प्राधान्य देणाऱ्या काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला निवडून द्यावे असे आवाहन काँग्रेसचे माजी आ. कैलास गोरंट्याल यांनी केले.
मंगळवारी जुना जालना भागातील दु:खीनगर येथे सायंकाळी कॉर्नर बैठक पार पडली. यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख, माजी जिल्हाध्यक्ष सुरेशकुमार जेथलिया, माजी सभापती भीमराव डोंगरे, एकबाल पाशा, शाह आलम खान, डॉ. संजय लाखे पाटील, कल्याण दळे, शेख महेमूद, राजेंद्र जाधव, मनकर्णा डांगे यांच्यासह काँग्रेस, राष्ट्रवादीच्या अन्य पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
यावेळी कैलास गोरंट्याल यांनी दानवे-खोतकर यांच्यातील वाद म्हणजे नुरा कुस्ती होती असे सांगून हा वाद कसा मिटला आणि त्यासाठी कसे ‘अर्थपूर्ण’ व्यवहार झाले, याची माहिती आपल्याकडे असल्याचा दावाही गोरंट्याल यांनी केला. आ. सत्तार यांच्या भूमिकेवरही गोरंट्याल यांनी टीका केली.
यावेळी राजाभाऊ देशमुख, डॉ. लाखे पाटील यांनीही विचार व्यक्त केले. विलास औताडे हे प्रामाणिक आणि काँग्रेसशी एकनिष्ठ असणारे नेते आहेत त्यामुळे त्यांना मतदारांनी आगामी काळात संधी द्यावी असे आवाहनही यावेळी करण्यात आले.
काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने अहोरात्र परिश्रम घेवून औताडे यांना विजयी करण्यासाठी सज्ज राहण्याचे आवाहन करण्यात आले. कार्यक्रमात एकबाल पाशा यांनीही मार्गदर्शन केले. यावेळी परिसरातील नागरिकांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती. सूत्रसंचालन शेख महेमूद यांनी केले. यावेळी कल्याण दळे यांनी उपस्थितांचे आभार मानले. यावेळी काँग्रेसचे सर्व नगरसेवक उपस्थित होते.