बुथ कमिटीचे काम यशस्वी करा- गोरंट्याल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2018 12:55 AM2018-06-25T00:55:48+5:302018-06-25T00:56:59+5:30

सर्वसामान्य जनतेशी प्रत्यक्ष संपर्क साधण्यावर भर देऊन काँग्रेस कार्यकर्त्यांनी जालना विधानसभा मतदार संघातील बुथ कमिटीचे काम यशस्वीपणे पार पाडावे, असे आवाहन माजी आ. कैलास गोरंट्याल यांनी रविवारी येथे बोलताना केले.

Do work successfully of Booth Committee - Gorantyal | बुथ कमिटीचे काम यशस्वी करा- गोरंट्याल

बुथ कमिटीचे काम यशस्वी करा- गोरंट्याल

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : सर्वसामान्य जनतेशी प्रत्यक्ष संपर्क साधण्यावर भर देऊन काँग्रेस कार्यकर्त्यांनी जालना विधानसभा मतदार संघातील बुथ कमिटीचे काम यशस्वीपणे पार पाडावे, असे आवाहन माजी आ. कैलास गोरंट्याल यांनी रविवारी येथे बोलताना केले.
जालना विधानसभा मतदार संघातील बुथ कमिटीसंदर्भात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत गोरंट्याल बोलत होते. यावेळी शहर कॉंग्रेसचे अध्यक्ष शेख महेमूद, अल्पसंख्याक विभागाचे जिल्हाध्यक्ष बदर चाऊस, जालना तालुकाध्यक्ष वसंत जाधव, न. प. गट नेते गणेश राऊत, जि. प. सदस्य सदाशिव शिंदे, न.प.चे माजी सभापती सुभाषराव वाघमारे, शेख रऊफ परसूवाले, सेवादल कॉंग्रेसचे अध्यक्ष संतोष माधोवले आदींची प्रमुख उपस्थिती होती.
पुढे बोलताना गोरंट्याल म्हणाले की, आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीला यशस्वीपणे सामोरे जाण्यासाठी कार्यकर्त्यांनी आतापासूनच सज्ज राहण्याची गरज आहे. देशात आणि राज्यात सत्तेत असलेल्या भाजपा सरकारने चार वर्षात केवळ थापा मारण्याचे काम केले असून, ही दोन्ही सरकारे सर्वपातळ्यावर अपयशी ठरली आहेत. येणारा काळ हा कॉंग्रेस पक्षाचा असून कार्यकर्त्यांनी या संधीचे सोने करण्यासाठी आतापासूनच कंबर कसून कामाला लागावे, असेही ते यावेळी म्हणाले.
शहराध्यक्ष शेख महेमूद यांनी बुथ कमिटीच्या कामात शहर कॉंग्रेसचे सर्व पदाधिकारी सर्वतोपरी सहकार्य करतील, अशी ग्वाही दिली. जालना तालुका बुथ कमिटी समन्वयक संजय शेजूळ यांनी बुथ कमिटीचे काम प्रत्यक्ष गावात जाऊन करण्याचे आवाहन यावेळी केले.
यावेळी नगरसेवक रमेश गौरक्षक, अजय भरतिया, जीवन सले, सय्यद अजहर, आरेफ खान, शेख शकील, संजय भगत, कोत्ताकोंडा, शेख नजीब लोहार, राधाकिसन दाभाडे, माजी नगरसेवक वैभव उगले, शहर कॉंग्रेसचे पदाधिकारी अस्लम कुरेशी, आदींची उपस्थिती होती.

Web Title: Do work successfully of Booth Committee - Gorantyal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.