लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जिल्हा प्रशासन तसेच विभागीय आयुक्तांच्या कडक निर्देशामूळे जिल्ह्यातील अवैघ वाळू उपशाला लगाम बसला आहे. ही बाब निश्चित चांगली म्हणावी लागेल. परंतु ही अवैध वाहतूक आणि उत्खन बंद करत असतांना जिल्ह्यातील वाळू घाटांचे लिलाव रखडल्याने मजुरांवर उपासमारीची वेळ आली असून, हाताला काम मिळत नसल्याचे वास्तव आहे. अवैध वाहतुकीवर कारवाई करून जो तो अधिकारी आपण किती सक्षम आहे, हे दाखविण्याचे प्रयत्न जिल्हाधिकारी तसेच आयुक्तांसमोर करत आहे.विभागीय आयुक्तांनी जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश देत अवैध वाळू वाहतूकीवर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. हे निर्देश जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी जिल्ह्यातील महसूल आणि पोलीसांना दिले आहेत. यात दुर्लक्ष करणाऱ्यांचे सीेआर अर्थात नोकरी पुस्तिकेत कारवाई न झाल्यास त्याची नोंद घेतली जाईल असेही सूचित केले आहे. त्यामूळे प्रत्येक जण वाळूची वाहतूक करणारे ट्रक, टिप्परवर नजर ठेवून आहे. आज अनेक ठिकाणी धडाकेबाज कारवाई सुरू आहे. त्यामूळे वाळूचे भाव वाढले असून, एक ब्रासचे ट्रॅक्टर चक्क पाच हजार रूपयांना मिळत असून, एक टिप्पर थेट ३० हजार रूपयांना मिळत असल्याचे चित्र आहे. त्यामूळे प्रशासनाच्या कारवाईने बांधकाम ठप्प झाले आहेत.सध्या औद्योगिक क्षेत्रात मंदी असल्याने रोजगाराची संख्या कमी झाली आहे. अनेकांना रोजगार मिळत नसून, सध्या रोजंदारीवर हक्काचा रोजगार मिळणारे एकमेव क्षेत्र म्हणजे बांधकाम क्षे आहे. परंतु गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून वाळू तसेच रॉयल्टी भरण्याच्या नावाखाली स्ट्रोन क्रशरही बंद असल्याने मोठी अडचण निर्माण झाली आहे. त्यामूळे मजूरांचा अलंकार चित्रपटगृह तसेच जुन्या जालन्यातील बाजार चौकी परिसरात सकाळी हाताला काम मिळेल या आशेवर आलेल्या अनेक मजुरांना काम नसल्याचे सांगण्यात येत असल्याने त्यांना रिकाम्या हाताने घरी परतावे लागत आहे.
तुमच्या ‘सीआर’साठी आमचा रोजगार हिरावू नका- मजुरांची आर्त हाक...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 06, 2020 1:19 AM