शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारचा मोठा निर्णय; 'वन नेशन वन इलेक्शन' प्रस्तावाला मंत्रिमंडळाची मंजुरी
2
"बाळासाहेब असते, तर तुम्हाला उलटे टांगले असते", बोरनारेंचा उद्धव ठाकरेंवर वार
3
जगातील अनेक देशांमध्ये 'वन नेशन वन इलेक्शन'चा फॉर्म्युला लागू, अशी आहे प्रक्रिया...
4
रोहित शर्माची मुलाखत घेताना पहिला प्रश्न कुठला विचारशील? विराट कोहलीने दिलं मजेशीर उत्तर
5
५०० रुपयांत गॅस सिलिंडर, मोफत उपचार... हरियाणा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून जाहीरनामा प्रसिद्ध, कोणासाठी काय-काय?
6
Bigg Boss Marathi Season 5: निक्कीसोबत मैत्री? वैभव चव्हाण म्हणाला, 'तोंडावर सांगतो तिच्याशी माझी कधीच..."
7
राज्याला महिला CM मिळेल? सुप्रिया सुळे-रश्मी ठाकरेंचे नाव चर्चेत? काँग्रेस खासदार म्हणतात...
8
“राहुल गांधींच्या जीवाला धोका, रणनीती आखली जाते, केंद्रीय गृहमंत्री...”; राऊतांचा मोठा आरोप
9
राहुल गांधी यांच्याविरोधात वादग्रस्त वक्तव्ये; काँग्रेस आरपारच्या भूमिकेत, कार्यकर्ते रस्त्यावर उतरले
10
४ वर्ष IPL च्या मैदानात! बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांची क्रिकेटमधून बंपर कमाई
11
Vastu Shastra: मीठ मोहरीने केवळ व्यक्तीचीच नाही तर वास्तुचीही दृष्ट काढता येते; वाचा वास्तु टिप्स!
12
BSEच्या शेअरमध्ये 'बुल रन'; दिवसभरात १५% पेक्षा अधिक वाढ; NSE IPO शी काय आहे कनेक्शन?
13
...अन् आमदार सुरेश भोळे पडले खाली; गणपती मिरवणुकीतील व्हिडीओ व्हायरल
14
IND vs BAN : ड्रॉप नाही करत म्हणत गंभीरनं या दोघांना बसवलं बाकावर
15
राजकीय स्टेटमेंट करणार नाही असे म्हणत जरांगेंचे पुन्हा फडणवीसांवर आरोप; काय म्हणाले...
16
रुग्णांकडून एक रुपया जास्त घेतली फी, भाजप आमदार झाले संतप्त; कर्मचाऱ्याची गेली नोकरी
17
Ricky Ponting प्रीती झिंटाच्या PBKS संघाच्या ताफ्यात; मिळाली ही मोठी जबाबदारी
18
"...तर फडणवीस मुख्यमंत्री होतील"; महाजनांच्या विधानावर शिंदे गट म्हणतो, "आम्ही वाद घालणार नाही, पण..."
19
नरहरी झिरवळांविरोधात शिंदेंच्या माजी आमदारानेच थोपटले दंड, दिंडोरीतून देणार आव्हान!
20
सुखी, समाधानी, समृद्ध जीवन हवे? पाहा, स्वामी समर्थ अन् शंकर महाराजांची प्रभावी वचने

"कोणीही छाताड बडवून घेऊ नका, हे श्रेय गरीब मराठ्यांचे"; गॅझेट अंमलबजावणीवर जरांगे म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2024 3:27 PM

हैद्राबाद गॅझेट, सातारा संस्थानचे गॅझेट हा विषय काही नवीन नाही. त्याची अंमलबजावणी करण्यासाठी सरकारने तातडीने पावले उचलली पाहिजेत.

- पवन पवार वडीगोद्री (जालना): राज्यातील मराठा समाजाने आपला हक्क मिळवण्यासाठी लढा सुरू ठेवला आहे. "कोणीही छाताड बडवून घेऊ नका, हे श्रेय गोरगरीब मराठ्यांचेच आहे," अशी ठाम भूमिका मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे यांनी हैद्राबाद गॅझेट लागू करण्याच्या हालचालीवर घेतली. ते म्हणाले, हैद्राबाद गॅझेटच्या अंमलबजावणीवर बोलताना जरांगे यांनी स्पष्ट केले की, या गॅझेटचे श्रेय फक्त गोरगरीब मराठ्यांचे आहे आणि हे यश देखील त्यांचेच आहे. तसेच त्यांनी जोरदार इशारा दिला की, मुख्यमंत्र्यांनी, छत्रपती संभाजीनगरच्या पालकमंत्री व खासदारांनी मराठा समाजाच्या अपेक्षांशी दगा फटका करू नये. ते अंतरवाली सराटी येथे आज दुपारी पत्रकार परिषदेत बोलत होते.

जरांगे पाटील यांनी पुढे सांगितले की, हैद्राबाद गॅझेट, सातारा संस्थानचे गॅझेट हा विषय काही नवीन नाही. त्याची अंमलबजावणी करण्यासाठी सरकारने तातडीने पावले उचलली पाहिजेत. आता राज्य सरकारच्या हालचाली सुरू आहेत यावर जरांगे म्हणाले. ''या हालचाली ३ महिन्यांपूर्वीच सुरू झालेल्या होत्या आणि आम्ही यावर आधीपासूनच लक्ष ठेवले आहे," असे ते म्हणाले. या गॅझेटच्या अंमलबजावणीमुळे सर्व मराठ्यांना मोठा फायदा होणार आहे. शंभूराज देसाई तीन महिन्यांपासून यासाठी प्रयत्नशील आहेत, परंतु मराठा समाज एवढ्यावर थांबणार नाही. "आम्हाला केवळ आश्वासन नको आहे, आम्हाला सगे सोयरे कायद्याची अंमलबजावणी पाहिजे," असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच आता आंदोलनाच्या निर्णायक टप्प्यावर सोमवारी रात्री १२ वाजेपासून बेमुदत उपोषण करणार असल्याचा पुनरुच्चार देखील त्यांनी यावेळी केला.

राज्यात दंगली झाल्या तर फडणीस-भुजबळ जबाबदारमनोज जरांगे पाटील यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि छगन भुजबळ यांच्यावर गंभीर आरोप केले. ते म्हणाले, "फडणवीस साहेबांना राज्यात रक्तपात घडवायचा आहे आणि मणिपूरसारखी परिस्थिती निर्माण करायची आहे. जर राज्यात काही दंगे झाले, तर त्यासाठी फडणवीस आणि भुजबळ जबाबदार असतील."

प्रत्येकाला आंदोलनाचा अधिकारमराठा आरक्षणाबाबत राज्यात सुरू असलेल्या विविध आंदोलने आणि त्यांच्यावर होणाऱ्या राजकीय हालचालींवर जरांगे पाटील म्हणाले, "राज्यात कोणालाही आंदोलनाचा अधिकार आहे, परंतु माझ्या मराठ्यांना खरचटले देखील नाही पाहिजे." आमच्या मराठ्यांना गाल बोट लागता कामा नये असे स्पष्ट करत जरांगे यांनी शासनाने राजेश्री उंबरे यांना काय आश्वासन दिलय ते त्यांनाच माहिती असे भाष्य केले. तसेच लक्ष्मण हाके यांच्या आमरण उपोषणावर भाष्य करताना जरांगे म्हणाले की, उपोषण हा प्रत्येकाचा अधिकार आहे. 

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षणJalanaजालना