लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जालना येथे गेल्या बेचाळीस वर्षापासून अविरतपणे सुरु असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर व्याख्यानमालेस सोमवारपासून उत्साही वातावरणात प्रारंभ झाला. दीपप्रज्वलन करुन व्याख्यानमालेचे उद्घाटन राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्या हस्ते करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उद्योजक दिलीप काळे यांची उपस्थिती होती. यावेळी विचारपीठावर व्याख्यानमालेचे अध्यक्ष तथा नगरसेवक अरुण मगरे, सचिव सुहास साळवे, पंडित भुतेकर, एन. डी. गायकवाड, सुनील साळवे, शाहीर आप्पासाहेब उगले, आत्माराम यादव आदींची उपस्थिती होती.यावेळी प्रमुख मान्यवरांसह चळवळीत कार्य करणाऱ्या अनेकांचा पुष्पहार आणि स्मृतिचिन्ह देऊन व्याख्यानमालेचे अध्यक्ष अरुण मगरे आणि सुहास साळवे यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. यावेळी शाहीर अप्पासाहेब उगले आणि त्यांच्या सहकारी कलावंतांनी आपल्या पहाडी आवाजात श्रोत्यांना खिळवून ठेवत डॉ. बाबासाहेब आंबेडकर, भगवान गौतम बुध्द, छत्रपती शिवाजी महाराज, माता रमाई, राजमाता मॉ जिजाऊ, सावित्रीबाई फुले आदींचा गुण गौरव करुन स्त्रीभ्रूण हत्येवरही मार्मिक शब्दातून प्रबोधन केले.या कार्यक्रमास चळवळीतील कार्यकर्त्यांसह मान्यवर तसेच समाजातील स्त्री- पुरुष, युवक- युवतींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. विजयकुमार कुमठेकर यांनी केले. उपस्थितांचे आभार व्याख्यानमालेचे सचिव सुहास साळवे यांनी मानले.दरम्यान, १३ एप्रिल पर्यंत मा. कृष्णराव फुलंब्रीकर नाट्यगृहात दररोज सायंकाळी ७ वाजता आयोजित व्याख्यानमालेस शहर व पंचक्रोशीतील नागरिक व महिलांनी उपस्थित राहून आंबेडकरी विचारांचे श्रवण करावे, असे आवाहन व्याख्यानमालेचे अध्यक्ष अरुण मगरे, सचिव सुहास साळवे, कोेषाध्यक्ष वैभव उगले, उपाध्यक्ष नंदाताई पवार, एम. पी. पवार, कैलास रत्नपारखे, विलास रत्नपारखे, सिमोन सुतार, दिनकर घेवंदे यांच्यासह कार्यकारिणीतील पदाधिकाऱ्यांसह अन्य सदस्यांनी एका निवेदनाव्दारे केले आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर व्याख्यानमालेस उत्साहात प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2019 12:27 AM