लोकमत न्यूज नेटवर्कपारडगाव : रिक्षाची वाढती संख्या आणि प्रत्येक घरात दुचाकी आल्याने रिक्षाला भाडे मिळणे कठीण झाले आहे. यामुळे रिक्षा चालविणे कठीण झाल्याने अशोक मधुकर सोनार यांनी शक्कल लढवून रिक्षातच रसवंती थाटून गावोगावी उसाचा रस विकण्याचा व्यवसाय सुरु करुन बेरोजगारीवर मात केली.घनसावंगी तालुक्यातील पारडगाव परिसरात यंदा कमी पाऊस झाल्याने शेतीच्या उत्पन्नावर परिणाम झाला आहे. शेतातच काही पिकले नसल्याने याचा परिणाम इतर व्यवसायावर आपोआपच पडतो. बाजारातील उलाढालीवर परिणाम झाला आहे. बाजारात म्हणावी तशी रेलचेल नसल्याने प्रवाशांची कमतरता आहे. पारडगावावरुन परतूर, घनसावंगीसह परिसरातील विविध गावात प्रवासी घेऊन आपल्या कुटंबियांची गुजराण अशोक सोनार तीन चार वर्षापासून करतात. मात्र, रिक्षाची वाढती संख्या आणि प्रत्येक घरात दुचाकी आल्याने प्रवाशांची संख्या घटली आहे. यामुळे रिक्षा चालविणे कठीण झाल्याचे सोनवणे यांनी सांगितले. काही वेळेस तर पेट्रोलचे पैसे निघणे कठीण होत होते. यामुळे संसार चालविणे जिकिरीचे ठरत होते. यावर उपाय म्हणून सोनवणे यांनी जुन्या रिक्षातच रसवंती थाटून रस विकण्याचा व्यवसाय सुरु करुन दुष्काळावर मात केली आहे.इतर बेरोजगार तरूणांना प्रेरणादायीपरिसरात कमी पावसामुळे रोजगाराचा प्रश्न गंभीर बनला आहे. यामुळे अनेकजण शहराकडे कामानिमित्त जात आहेत. असे असतांना अशोक सोनवणे यांनी आपल्याकडे असलेल्या रिक्षाचा चांगला उपयोग करुन रोजगार सुरु केल्याने इतरांसाठी तो प्रेरणादायी ठरत आहे.
रिक्षातच प्या उसाचा रस !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2018 12:32 AM