लोकमत न्यूज नेटवर्कजालना : पाणी फिल्टर अस्वच्छता, प्लॅटफॉर्म क्रमांक २ च्या पटरीच्या बाजूला असलेली दुर्गंधी पाहून रेल्वेच्या नांदेड विभागाचे विभागीय व्यवस्थापक त्रिकालाज्ञ राभा यांनी मंगळवारी नाराजी व्यक्त करून तातडीने स्वच्छता करण्याचे अधिका-यांना सांगितले आहे.रेल्वेस्थानकातील विकास कामांची पाहणी करण्यासाठी १२ डिसेंबरला दक्षिण मुख्य रेल्वेचे मुख्य व्यवस्थापक येणार आहेत. यामुळे दहा दिवसात त्रिकालाज्ञ राभा यांनी मंगळवारी दुस-यांदा दौरा करून येथील विकास कामांचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी तब्बल सव्वा तास रेल्वेस्थानकावरील विविध कामांची पाहणी केली. सर्वप्रथम त्यांनी प्लॅटफॉर्म क्र. दोनच्या आजूबाजूच्या कामांची पाहणी केली. यावेळी प्लॅटफॉर्म वरील पाणी फिल्टरच्या आजूबाजूची स्वच्छता करण्याचे सांगून रेल्वेरुळावर पाणी भरण्याचे पाईप बसविण्याचे सांगितले. यानंतर प्लॅटफॉमवर खचलेले सिमेंट पाहून तातडीने काँक्रिटीकरण करण्याचे सांगून ते मजूर युनियन कार्यालयाकडे गेले. तेथील सूचना फलकाची अवस्था पाहून त्यांनी नाराजी व्यक्त केली.यानंतर निरीक्षक कार्यालयाकडे गेले. तिथे त्यांनी स्वत:चे वजन मोजून काटा सुरू आहे का बंद; याची खात्री करून घेतली. यानंतर त्यांनी रेल्वे कर्मचा-यांसाठी असलेल्या रूग्णालयाकडे मोर्चा वळविला. रूग्णालयात अधिक प्रमणात डास होते. तसेच तेथील गोळ्या-औषधांच्या बॉक्सवरीही अस्वच्छता आढळून आल्याने ते चांगलेच संतप्त झाले होते. ही सफाई तातडीने करण्याचे निर्देश स्टेशन अधिक्षकांना दिले. एकूणच त्यांनी या दौºयातही अधिका-यांची कानउघाडनी केली.राभा यांनी २६ नोव्हेंबर रोजी येथील रेल्वेस्थानकाची पाहणी केली होती. दरम्यान त्यांनी अवैध ठिकाणी होत असलेल्या दुचाकी पार्किंग संदर्भात तीव्र नाराजी व्यक्त करून परिस्थिती सुधारण्याचे सांगितले होते. पण, अजूनही ही परिस्थिती सुधारलेली नाही. मागील वेळेस त्यांनी ज्या कामांची सुधारणा करण्याचे सांगितले होते. त्याकामांची त्यांनी साधी मंगळवारी पाहणी केलीनाही.
‘डीआरएम’ नी टोचले अधिकाऱ्यांचे कान !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 05, 2018 12:45 AM