लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जिल्ह्यात सध्या दुष्काळामुळेशेतकरी हैराण आहेत. या दुष्काळी स्थितीतही गेल्या दोन महिन्यात दुधाचे संकलन वाढल्याने एक प्रकारे पशुपालकांना दिलासा मिळणारी ही बाब असल्याचे सांगण्यात आले. आज जरी दुधाचे संकलन चांगले असले तरी, येत्या दोन महिन्यात चाराटंचाईमुळे हे संकलन घटणार असल्याची चिंता व्यक्त होत आहे.जालना जिल्ह्यातील आठही तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे दुष्काळात मिळणाऱ्या सर्व सवलती आता शेतकºयांना मिळत आहेत. यंदा जिल्ह्यात पाणीटंचाईने देखील रौद्ररूप धारण केले आहे. यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. असे असतानाच सध्या गायी आणि म्हशीच्या दुधाचे संकलन वाढल्याने पशुपालकांना दिलासा मिळाला आहे.जालना येथील जुन्या औद्योगिक वसाहतीत दुधावर प्रक्रिया करणारा प्रकल्प आहे. त्यात सध्या केवळ १० हजार लिटर दुधावर प्रक्रिया करून हे दूध सध्या अहमदनगर, नाशिक तसेच मुंबईला पाठविले जाते. माहोरा, देऊळगावराजा येथून आलेल्या दुधावर येथे प्रक्रिया केली जात आहे. दरम्यान, या प्रक्रिया केंद्राची क्षमता वाढविण्यासाठी दुग्धविकास राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी नवीन प्रस्ताव तयार केला असून, या दूध प्रक्रिया केंद्रात दूध संकलनाची क्षमता ही तीस हजार लिटरवर नेण्यात येणार आहे. जालना जिल्ह्यात बाहेरच्या जिल्ह्यातून हजारो लिटर दूध येते.या दूधाची नियमितपणे तपासणी होत नसल्याने त्यातील तथ्य समोर येत नाही. त्यामुळे याची अचानक तपासणी झाल्यास बराच मोठा गोंधळ पुढे येऊ शकतो. परंतु, यासाठी यंत्रणेने पुढाकार घेण्याची गरज वर्तविण्यात येत आहे. परंतु, हे होत नसल्याचे वास्तव आहे.जालना : ३६ हजार दुधाचे संकलनजालना जिल्ह्यात सध्या भोकरदन आणि जाफराबाद तालुक्यातील दूध संकलनावर काहीअंशी परिणाम झाला आहे. जालना जिल्ह्यात एक खासगी अर्थात समर्थ दूध संघ असून, दूध संकलन करणा-या संस्थाची संख्या ही ८४ असल्याची माहिती देण्यात आली. आहे. मध्यंतरी जालना जिल्ह्यातील दूध संकलन वाढावे म्हणून दूग्ध विकास विभागाला भगिरथ प्रयत्न करावे लागत होते. मात्र आता ऐन दुष्काळात थेट ३६ हजार ४०० लिटर दूध संकलन झाले आहे.जालना जिल्ह्यातील शेतक-यांनी शेती सोबतच दूधाचा जोडधंदा केल्याने संकलन वाढले आहे. शेतकºयांना आता दूध व्यवसायाचे समीकरण समजले असून, केवळ दुधच नव्हे, तर त्यापासून खवा निर्मितीचा व्यवसायकही चांगलाच तेजीत आहे. आज खव्याला मोठी मागणी असून, खव्याचे आजचे भाव हे सरासरी २०० रूपयांपेक्षा जास्त असल्याने त्यातून ब-यापैकी पैसे मिळत असल्याचे शेतक-यांचे म्हणणे आहे.- एस.एन. आदमाने,जिल्हा दुग्ध विकास अधिकारी
दुष्काळातही दुधाची गंगा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 02, 2018 12:57 AM