मालमत्ता करावरून जुंपली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2018 01:00 AM2018-10-11T01:00:42+5:302018-10-11T01:01:47+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : शहरातील मालमत्ताचे चुकीचे सर्वेक्षण करुन जालना नगरपालिकेने मालमत्ताचे क्षेत्रफळ वाढवून जास्तीची कर आकारणी भरण्यासंबधीच्या नोटीसा नागरिकांना पाठवल्या आहेत. त्या नोटीसा तातडीने मागे घेवून नाव्याने सर्वेक्षण करावे, अशी मागणी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा माजी नगरध्यक्ष यांनी एका निवेदनाव्दारे केली आहे.
जालना पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना अंबेकर यांनी निवेदन दिले आहे. त्यात म्हंटले आहे की, जालना नगरपरिषदेने शहरातील मालमत्ता कराचे नव्याने सर्वेक्षण केले आहे. ज्यात चुकीच्या पध्दतीने कर आकारणी होण्याची दाट शक्यता असून, ज्यांचे घर एक मजल्याचे आहे. अशांना त्यांचे घर दोन मजली असल्याचे दाखवून वाढीव कर भरण्यासंबधी सुचना केली आहे. यासर्दभात अक्षेप दाखल करण्याबाबत सांगितले आहे. परंतु, हे सर्वेक्षण चुकीचे असून, पालिकेच्या चुकीच्या धोरणामुळे नागरिकांना नाहाक अर्थिक बोजा सहन करावा लागणार आहे. शहरात अधिच नागरी सुविधाचा बोजवारा उडाल्याचे अंबेकरांनी नमूद केले आहे.
करवाढ योग्यच- संगीता गोरंट्याल
४शहरातील मालमत्ता कराचे सर्व्हेक्षण करून कर वाढीसंदर्भात आक्षेप मागविले आहेत. अद्याप कुठलीच वाढीव करवाढ लागू केली नाही. केवळ राजकारण म्हणून शिवसेनेकडून आरोप केले जात असल्याचा आरोप नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल यांनी केला आहे.