लोकमत न्यूज नेटवर्कपरतूर : परतूर - आष्टी मार्गावर सिमेंट काँक्रिटीकरणाचे काम सुरु करण्यात आले आहे. वाहनांना ये - जा करणाऱ्यासाठी तयार करण्यात आलेला पर्यायी रस्त्यावर जागोजागी खड्डे पडल्याने अपघात वाढले आहे. जडवाहनांचा अपघात होत आहेत.परतूर आष्टी रस्त्याचे काम सुरू आहे. यातच काही ठिकाणी पुलाचेही काम सुरू आहे. या मार्गावर मोठया प्रमाणात वाहतूक वाढली आहे. बागेश्वरी साखर काराखाना सुरू असल्याने ऊसाने भरलेली वाहने या मार्गावरुन जावे लागते. मात्र कच्या रस्त्यामुळे जड वाहनांना जाण्यास अडचणी येत आहे. पर्यायी रस्त्यावर खडी टाकून रस्ता पक्का करण्याची मागणी कारखाना प्रशासनासह परिसरातील नागरिकांनी संबधीत गुत्तेदारास केली होती. मात्र याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. शुक्रवारी बागेश्वर साखर कारखान्याकडे ऊस घेऊन निघालेल्या डबल ट्राली ट्रक्टरचे मुंडके अचानक वर उचलल्या गेले. तसेच तीन दिवसात अनेक जड वाहने उलटले आहेत. चालकांच्या प्रसंगावधाने मोठा अपघात टळला आहे. पुलाचे, रस्त्याचे काम सुरु असतांना वाहतूकीसाठीही सुरळीत रस्ता करणे आवश्यक आहे. मात्र याकड संबधीत गुत्तेदाराने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याने वाहनधारकात संताप आहे. वाहनधारकांची गैरसोय बघता परिसरातील रस्त्याची तातडीने काम पूर्ण करावे अथवा पर्यायी रस्ता चांगला करण्याची मागणी होत आहे.
रस्त्याच्या कामामुळे वाहने उलटू लागली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2018 1:08 AM