लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जुना जालना भागाला पाणीपुरवठा करणाऱ्या जायकवाडी योजनेच्या जलवाहिनीवर अत्याधुनिक व्हॉल्व्ह बसविण्याचे काम गत चार दिवसांपासून हाती घेण्यात आले होते. हे काम अंतिम टप्प्यात आले असून, रविवारपासून जुना जालना भागातील विविध परिसरांत पाणीपुरवठा सुरळीत करण्यात येणार असल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाच्या सभापती पूनम स्वामी यांनी दिली.जालना शहर व परिसरात गेल्या चार दिवसांपासून पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याने नागरिकांमध्ये नाराजी होती. ऐन उन्हाळ्यात टंचाई जाणवत असल्याने व्हॉल्व्ह बसविण्याचे काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी होती. त्यासाठी पालिकेने अतिरिक्त कर्मचारी नियुक्त करून हे व्हॉल्व्ह बसविले आहेत. रविवारी जुना जालना भागातील गांधी चमन, कचेरी रोड, तुळजा भवानी नगर, गणेश नगर इ. भागांमध्ये हा पाणीपुरवठा होणार आहे. तर नवीन जालना भागालाही रविवारी वेगवेगळ्या भागांत पाणीपुरवठा करण्यात येणार असून, संभाजीनगरसह अन्य भागांचा यात समावेश आहे.पाण्याचा अपव्यय थांबवावारविवारी जागतिक जलदिन आहे. जालनेकरांना हंडाभर पाण्याचे महत्त्व माहिती आहे. त्यामुळे चार दिवसानंतर होणाºया पाणीपुरवठ्याच्या वेळी नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी.वाया जाणारे पाणी रोखण्यासाठी स्वयंस्फूर्तीने पुढाकार घेऊन जलदिनाच्या दिवशी पाणी वाया जाणार नाही, याची काळजी घेण्याचे आवाहन पालिकेच्या पाणीपुरवठा समितीच्या सभापती पूनम राज स्वामी यांनी केले आहे.
आजपासून होणार सुरळीत पाणीपुरवठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2020 23:05 IST