काँग्रेसमुळे देशाचे आर्थिक नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2018 12:59 AM2018-04-13T00:59:24+5:302018-04-13T00:59:24+5:30

संसदीय कामकाज बंद पाडण्याच्या काँग्रेसच्या भूमिकेविरुद्ध गुरुवारी भाजपाच्या वतीने येथील मामा चौकात एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले.

Economic losses of country due to Congress | काँग्रेसमुळे देशाचे आर्थिक नुकसान

काँग्रेसमुळे देशाचे आर्थिक नुकसान

Next

ल्ोकमत न्यूज नेटवर्क
जालना : संसदीय अधिवेशनाचा प्रत्येक मिनिट महत्त्वाचा असताना काँग्रेससह विरोधकांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे कामकाज चालू न दिल्यामुळे देशाचे आर्थिक नुकसान होत असल्याचे भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस आ. संतोष दानवे म्हणाले.
संसदीय कामकाज बंद पाडण्याच्या काँग्रेसच्या भूमिकेविरुद्ध गुरुवारी भाजपाच्या वतीने येथील मामा चौकात एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले. त्या वेळी आ. दानवे बोलत होते.
भाजपा जिल्हाध्यक्ष रामेश्वर भांदरगे, उपाध्यक्ष भास्कर दानवे, सरचिटणीस देविदास देशमुख, बद्रीनाथ पठाडे, ओबीसी मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष अंशोक पांगारकर, किरण खरात, प्रशांत वाढेकर, आयेशा खान, शहराध्यक्ष सिद्धीविनायक मुळे, वसंत जगताप, राजेंद्र देशमुख, गोविंदराव पंडित, अवधूत खडके, देवनाथ जाधव, रावसाहेब भवर, जिजाबाई जाधव, विजया बोरा, बाबूराव खरात, जितेंद्र संचेती, संध्या देठे, संजय आटोळे, गणेश फुके, साहेबराव कानडजे, आशा माळी, दीपक ठाकूर, रामलाल चव्हाण, रवी अग्रवाल, सुधाकर खरात यांची या वेळी प्रमुख उपस्थिती होती.
आ. दानवे म्हणाले, की भाजप जातीपातीचे राजकारण न करता डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराने राज्य करत आहे. मात्र, काँग्रेस -राष्ट्रवादी काँग्रेस जाती, समाजामध्ये भांडणे लावण्याचे काम करत आहे. देशात व राज्यात विविध विकास कामे सुरू असून, काँग्रेस केवळ संसदेत गोंधळ घालून काम बंद पाडण्याचा प्रयत्न करत आहे.
भाजपाच्या अन्य पदाधिकाऱ्यांनीही यावेळी काँग्रेसच्या धोरणावर जोरदार टीकास्त्र सोडले.
नगरसेवक चंपालाल भगत, अ‍ॅड. राहुल इंगोले, शशिकांत घुगे, सुनील राठी, कृष्णा जिगे, धन्नू काबलीवाले, नवनाथ जोगदंड, सुरेंद्र शेडुते, सुरेश कदम, संजय डोंगरे, मदनलाल सिंगी, गणेश नरवडे, बाबासाहेब कोलते, रवींद्र कायंदे, नामदेव नागवे, डॉ. पुरी, संतोष वाघ, सुभाष पवार, अमोल कारंजेकर, माधुरी दायमा, सखूबाई पनबिसरे, सुभाष सले, रोहित नलावडे यांच्यासह भाजप कार्यकर्त्यांची उपोषणस्थळी मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
भाजपाच्यावतीने प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांच्या नेतृत्त्वाखाली मामा चौकात लाक्षणिक उपोषण केले जाणार होते. मात्र, जालना लोकसभा मतदार संघात फुलंब्री, सिल्लोड, पैठण भागाचा समावेश असल्याने खा. दानवे यांनी पदाधिकाºयांसह औरंगाबाद येथील गुलमंडी चौकात लाक्षणिक उपोषण केल्याचे भाजपाच्या वतीने सांगण्यात आले.

Web Title: Economic losses of country due to Congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.