आढावा : ऑनलाइन शिक्षणासह इतर बाबींची घेतली माहिती
जालना : कोरोनामुळे पहिली ते सातवीपर्यंत शाळा बंद असून, ऑनलाइन शिक्षण सुरू आहे. या धर्तीवर जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षणाधिकारी कैलास दातखिळ यांनी मंगळवारी प्राथमिक शिक्षण घेणाऱ्या मुलांच्या घरी जाऊन संवाद साधला. ऑनलाइन शिक्षणासह त्यात येणाऱ्या अडचणींची त्यांनी माहिती घेतली.
कोरोनामुळे प्राथमिक शाळा बंद आहेत. केवळ आठवी ते बारावीचे वर्ग सध्या सुरू आहेत; परंतु या वर्गालाही अल्प प्रतिसाद आहे. प्राथमिक विभागाच्या मुलांना ऑनलाइन शिक्षण दिले जात आहे. ग्रामीण भागातील मुले शिक्षणापासून वंचित राहू नयेत यासाठी केंद्र, शाळा स्तरावर विविध उपक्रम राबविले जात आहेत. याचाच एक भाग म्हणून जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी कैलास दातखिळ यांनी मंगळवारी वखारी, नाव्हा, साळेगाव गावाला भेटी दिल्या. दातखिळ यांनी ग्रामीण भागातील ऑनलाइन, ऑफलाइन शिक्षणाची स्थिती प्रत्यक्ष घरोघरी जावून जाणून घेतली. मुलांसह पालकांशी संवाद साधला. मुलांच्या अभ्यासक्रमासह अडचणी जाणून घेत त्या सोडविण्याचे आश्वासन दिले. तसेच शिक्षकांशी संवाद साधून आवश्यक त्या सूचना दिल्या.
कोट
कोरोनामुळे प्राथमिकचे वर्ग बंद असले तरी ऑनलाइन शिक्षण सुरू आहे. ग्रामीण भागातील मुलांसह पालकांशी संवाद साधून अडचणी जाणून घेतल्या. तसेच अभ्यासक्रमाबाबत शिक्षकांना आवश्यक त्या सूचना दिल्या आहेत.
योजनांची अंमलबजावणी
शासन निर्देशानुसार शालेय पोषण आहारासह इतर योजनांची अंमलबजावणी केली जाणार आहे. यासाठी वरिष्ठ अधिकारी ते शिक्षक प्रयत्न करणार असल्याचे दातखिळ यांनी सांगितले.
फोटो ई-मेल