विजय मुंडे ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : विद्येची देवता असलेल्या गणरायासह अनेक देव-देवता, महापुरूषांच्या मूर्तीला आकार देणा-या राजस्थानी मूर्तीकारांची दैनंदिनी बिकटच! सरकारी शाळेत शिकणारी मुले शाळा सुटल्यानंतर आई-वडिलांना कामात मदत करतात. तर रात्री सौरदिव्याचा आधार घेऊन अभ्यास करतात. मात्र, सोयी- सुविधांपासून कोसो दूर असलेल्या जालना शहरातील या मूर्तीकारांच्या मुलांचे शैक्षणिक भविष्य अंधारातच आहे.शहरातील देऊळगाव राजा रोडच्या कडेला विजय भाटी, चंपालाल सारंग आणि गिगाराम राठोड हे तीन राजस्थानी मूर्तीकार सहकुटुंब राहतात. गणेश मूर्ती, देवींच्या मूर्ती, छत्रपती शिवाजी महाराज, गौतम बुध्द, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदी महापुरूषांच्या मूर्ती येथे तयार होतात. शिवाय घराची शोभा वाढविणाºया विविध मूर्त्यांनाही येथे रंग दिला जातो. या मूर्तींच्या विक्रीतून मिळणाºया उत्पन्नावरच या तिन्ही मूर्तीकारांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो.चंपालाल सारंग यांना तीन, विजय भाटी यांना चार, तर गिगाराम राठोड यांना पाच मुले आहेत. विजय भाटी यांची मुले लहान आहेत. तर राठोड यांच्या तीन मुलांसह एक मुलगा शिक्षण घेतो. चंपालाल सारंग यांच्या दोन मुली आणि एक मुलगाही शिक्षण घेतो. या मुला-मुलींचा दाखला सरकारी शाळेत! पालक अशिक्षित आणि परंपरेनुसार मूर्तीकाम करणारे. परिणामी शाळेचे नावही त्यांना आठवेना! मूळ गाव प्रतापगड (जि.पाली, राजस्थान) त्यामुळे बोली भाषा हिंदी आणि राजस्थानी. मुलांचे शिक्षण सरकारी शाळेत. दिवाळीच्या सुटी संपल्यानंतर बुधवारी शाळेची घंटा वाजली होती. मात्र, ही मुले पालकांसमवेत देवदेवतांच्या, महापुरूषांच्या मूर्तींना आकार देण्यात दंग होती! लहान मुले भावंडांसमवेत मस्ती करीत होती. तर एक लहान मुलगा गणरायाच्या मूर्तीसमोर झोळीत झोपलेला. शाळा भरली, पण पुस्तकं नाहीत. शाळेत जे शिकवितात ते घरी येऊन अभ्यास करतो. रात्री सौर दिवा लावून अभ्यास करतो. कधी काम असले तर शाळेला दांडी मारतो, असे बोली भाषेत सांगताना बालकांच्या चेह-यावर निरागस हास्य येत होते. मात्र, पालात असलेले वास्तव्य, शिक्षणासाठी लागणाºया सोयी-सुविधांपासून कोसोदूर असलेल्या या निरागस मुला-मुलींचे शैक्षणिक भविष्य खरेच उज्ज्वल ठरेल का ? हा प्रश्न मात्र निरूत्तरच आहे!
जालन्यातील मूर्तिकारांच्या मुलांचे शैक्षणिक भवितव्य अंधारात!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2019 12:31 AM
विजय मुंडे । लोकमत न्यूज नेटवर्क जालना : विद्येची देवता असलेल्या गणरायासह अनेक देव-देवता, महापुरूषांच्या मूर्तीला आकार देणा-या राजस्थानी ...
ठळक मुद्देसरकारी शाळेत दाखला : रात्रीच्या अभ्यासाला सौर दिव्याचा आधार; विद्येच्या देवतेची मूर्ती बनविणाऱ्यांच्या पाल्यांची कथा...!