शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
2
अमित ठाकरेंची कोंडी? सदा सरवणकर थेट पंतप्रधान मोदींना भेटले; वाकून नमस्कार केला अन्...
3
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
4
जया बच्चन यांना हसताना पाहून नेटकरी चकित, आगामी सिनेमाच्या पोस्टरमध्ये वेगळाच लूक
5
Zomato १ अब्ज डॉलर्सचा QIP लाँच करण्याची शक्यता, पाहा काय आहे कंपनीचा प्लान?
6
Maharashtra Election 2024 Live Updates: अमित ठाकरेंना विधान परिषदेवरून आमदारकीची ऑफर दिली होती- देवेंद्र फडणवीस
7
'प्रथम महाराष्ट्र, मग पक्ष, शेवटी स्वतः!' केवळ उक्ती नव्हे, कृतीतून सिद्ध करणारे देवेंद्र फडणवीस
8
आधी ‘बटेंगे तो कटेंगे’ला विरोध, आता मोदींच्या सभेला दांडी, अजित पवारांच्या मनात चाललंय काय?  
9
IND vs SA: मालिका जिंकण्यासाठी मोठा निर्णय? Rinku Singh संघाबाहेर, 'या' स्टार खेळाडूला संधी
10
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
11
विशेष लेख: गणिते बिघडली, झोप उडाली.. युती की आघाडी?
12
पोलिसांनी शूटरलाच विचारले ‘कोणाला पाहिलं काय?’; बाबा सिद्दिकी प्रकरणातील धक्कादायक माहिती उघड
13
गजकेसरी योगात सूर्य-शनी गोचर: ७ राशींना अनुकूल, सकारात्मक काळ; लक्ष्मी कृपा अन् यश प्रगती!
14
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
15
तरुणीने बोलावले म्हणून लॉजवर गेला; मात्र नंतर तरुणासोबत घडला धक्कादायक प्रकार!
16
अग्निशमन दलातील माणसांचं वेदनादायी आयुष्य! 'अग्नी'चा ट्रेलर; जितेंद्र जोशी-सई ताम्हणकरची खास भूमिका
17
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
18
सोयाबीनला सहा हजाराचा हमीभाव देणार; PM मोदींची मोठी घोषणा
19
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
20
"एक माणूस म्हणून तो...", इब्राहिमसोबतच्या नात्यावर पलक तिवारीने केलं होतं भाष्य

कृषी योजना प्रभावीपणे राबवा- पालकमंत्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2018 12:43 AM

शेतकऱ्यांच्या गरजा आणि भौगोलिक पार्श्वभूमी लक्षात घेऊन कृषी विभागाने कृषी विकासाच्या योजना अधिक प्रभावीपणे राबवाव्यात असे निर्देश पालकमंत्री लोणीकर यांनी रविवारी मंठा येथे आयोजित आढावा बैठकीत दिले

लोकमत न्यूज नेटवर्कमंठा : जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या गरजा आणि भौगोलिक पार्श्वभूमी लक्षात घेऊन कृषी विभागाने कृषी विकासाच्या योजना अधिक प्रभावीपणे राबवाव्यात असे निर्देश पालकमंत्री लोणीकर यांनी रविवारी मंठा येथे आयोजित आढावा बैठकीत दिले तसेच १ ते ३१ जुलै या वनमहोत्सवाच्या काळात जिल्ह्यात ३६ लक्ष २२ हजार वृक्ष लागवड करून मोहीम यशस्वी करणार असल्याचे लोणीकर म्हणाले.मंठा येथील सरस्वती मंगल कार्यालयात ही बैठक झाली बैठकीस अप्पर जिल्हाधिकारी प्रकाश खपले, उपविभागीय अधिकारी ब्रिजेश पाटील, केशव नेटके, संदीप पाटील, जिल्हा सहकार निबंधक नारायण आघाव, वनधिकारी शिंदे, कृषी विभागाचे कुलकर्णी, जि.प. सदस्य राहुल लोणीकर, भुजंगराव गोरे, गणेशराव रोकडे, अंकुश बोराडे, गणेश खवणे, पंजाबराव बोराडे नाथराव काकडे, सुभाष राठोड, बाबूराव शहाणे, बी.डी. पवार ज्ञानेश्वर शेजूळ, संदीप गोरे, राजेश मोरे, भाऊसाहेब कदम आदींसह अन्य विभागाचे खातेप्रमुख उपस्थित होते.आपण नुकताच इस्रायलचा दौरा केला, तेथील तंत्रज्ञानानाच्या मदतीतून मराठवाड्यातील पाणी टंचाईवर मात करता येणे शक्य असून, तसे करारही आम्ही तेथील कंपन्यां सोबत केल्याचे लोणीकर यांनी सांगितले. या दौºयातच इस्रायल येथील शेतीलाही भेटी देण्यात आल्या इस्रायल हा एकमेव देश असा आहे की, ज्याचे कृषि तंत्रज्ञान संपूर्ण जगाने स्वीकारले आहे. कृषी क्षेत्रातील अत्युच्च तंत्रज्ञान येथील शास्त्रज्ञांनी विकसित केले आहे. त्याला जगात तोड नाही शेतीसाठी ६० टक्के, पिण्यासाठी ३० टक्के तर उद्योगांसाठी १० टक्के असे पाणीवाटपाचे प्रमाण आहे या बैठकीत पीकविमा, बोंडअळीचे अनुदान पीककर्ज वाटप याचाही आढावा घेण्यात आलाबैठकीच्या प्रारंभी गुणवंत विद्यार्थी व शेतीनिष्ठ प्रगतीशील शेतक-यांचा पालकमंत्र्याच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच पालकमंत्री लोणीकर यांनी ईस्राईल दौरा यशस्वीपणे पूर्ण केल्याने नागरिकांच्या वतीने त्यांचा नागरी सत्कार करण्यात आला.इस्त्राईलच्या दौ-यावर गेलेल्या अधिकाºयांमध्ये जालन्यातील जीवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता अजय सिंग यांचाही समावेश होता. हा दौरा महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार असून, पाणी पुरवठ्यासह कृषी संबंधित वेगवेगळ्या उद्योग समूहांसोबत चर्चा करण्यात येऊन अनेक निर्णय घेण्यात आले आहेत. त्यामुळे येत्या महिनाभरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सविस्तर अहवाल सादर करणार आहोत. मराठवाड्यातील पाणी टंचाई दूर करण्यासाठी महत्त्वाकांक्षी असलेली वॉटरग्रीड योजना पूर्णत्वास नेण्यासाठी इस्त्राईलच्या अभियंत्यांची मदत मिळणार असल्याचे ते म्हणाले.मंठा : कर्ज वाटपाकडे अधिका-यांनी दुर्लक्ष करू नयेशेतक-यांना जास्तीत जास्त कर्ज देण्यासाठी जिल्हा नियोजन समितीने बाराशे कोटी रूपयांचा आराखडा तयार केला आहे. त्यातून आज २५ हजार शेतक-यांना १२८ कोटी रूपयेच वाटप झाले आहेत. याची गती बँकांनी वाढवावी नसता कामचुकार बँकांवर कारवाईचा बडगा उगारला जाणार असल्याचे ते म्हणाले. केवळ ठेवी घेण्याकडे कल न ठेवता व्यापारी, राष्ट्रीयीकृत बँकांनी मदत करण्याचे आवाहन त्यांनी केले.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रBabanrao Looneykarबबनराव लोणीकर