लोकमत न्यूज नेटवर्कभोकरदन : तालुक्यातील शासकीय कापूस खरेदी केंद्रांवरील मजूर होळी व धूलिवंदन या सणासाठी गावाकडे जाणार आहेत. त्यामुळे पाच कापूस खरेदी केंद्र आठ दिवस (७ ते १५ मार्च) बंद ठेवण्याचा निर्णय केंद्रप्रमुुखाने घेतला आहे.भोकरदन तालुक्यात सीसीआयच्या वतीने पाच ठिकाणी कापूस खरेदी केली जात आहे. यामध्ये भोकरदनच्या चार तर राजूर येथील एका खरेदी केंद्राचा समावेश आहे. पाचही खरेदी केंद्रावर आजवर ८१ कोटी रूपयांमधून १ लाख ५० हजार क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली आहे. अशी माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती कौतीकराव जगताप यांनी दिली. सद्यस्थितीत जिनिंगमध्ये कापूस साठविण्यासाठी कमी जागा आहे. शिवाय तयार केलेल्या गाठी ठेवण्यासाठी सुद्धा शहरात जागा नाही. त्यामुळे कापूस खरेदी करण्यासाठी अडचणी निर्माण होत आहे. यातच तयार केलेल्या सरकीला सुद्ध मागणी नसल्याचे ती जागेवर पडून आहे. तसेच मागील आठ दिवसांपासून ५०० वाहने शहरातील कापूस खरेदी केंद्राबाहेर मोजमापासाठी उभी आहेत. याचा शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड बसत आहे.महाराष्ट्र राज्यातील कापूस उद्योग हा मध्यप्रदेशातील मजुरांवरच चालत असल्याची वस्तूस्थिती आहे. भोकरदन तालुक्यातील पाच जिनिंगवर २५० पेक्षा अधिक मजूर हे मध्यप्रदेशातील आहेत. त्यांचा होळी व धुलिवंदन हा सर्वात मोठा सण असतो, त्यामुळे हे मजूर या सणाला गावाकडे निघून जातात.त्यांना कोणीही थांबवू शकत नसून, नाईलाजात्सव आठ ते १० दिवस कापूस उद्योग बंद ठेवावा लागत आहे. ७ मार्च ते १५ मार्च या दरम्यान तालुक्यातील पाच कापूस खरेदी केंद्र बंद ठेवण्यात येणार आहे. असे केंद्र प्रमुख धारेअप्पा होंनागोळ यांनी खरेदी केंद्राच्या बाहेर परिपत्रक लावले आहे.
आठ दिवस शासकीय कापूस खरेदी बंद, वाहनांच्या रांगा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 05, 2020 12:23 AM