लोकमत न्यूज नेटवर्कजालना : विविध ठिकाणांहून दुचाकी लंपास करणाऱ्या चोरट्यास जालना येथील एडीएसच्या पथकाने जेरबंद केले. त्याच्याकडून १ लाख ८५ हजार रुपये किमतीच्या ८ दुचाकी ताब्यात घेण्यात आल्या आहेत. ही कारवाई मंगळवारी सकाळी जालना शहरातील जेईएस महाविद्यालयाच्या आवारात करण्यात आली.विशाल दुर्याधन इंगळे (रा. लिंबी ता. बारशी टाकळी जि. अकोला) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. अकोला, बुलढाणा, औरंगाबाद, जालना, शेगाव आदी ठिकाणाहून विशाल इंगळे याने दुचाकींची चोरी केली आहे. चोरलेल्या दुचाकी त्याचा मित्र रत्नदीप पांडे (रा.जालना) याच्याकडे ठेवल्या असून, दोन दुचाकी विक्री करण्यासाठी इंगळे हा मंगळवारी जालना शहरातील जेईएस महाविद्यालयासमोर येणार असल्याची माहिती एडीएसचे प्रमुख पोनि. यशवंत जाधव यांना मिळाली होती. या माहितीवरून (पान दोनवर)एडीएसच्या पथकाने विशाल इंगळे याला दोन दुचाकींसह ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केल्यानंतर त्याचा मित्र रत्नदीप पांडे (रा.जालना) याच्याकडे इतर दुचाकी असल्याची माहिती मिळाली.त्यानुसार एडीएसच्या पथकाने पांडे याच्या घराच्या आवारातून सहा दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या. पांडे मात्र, फरार झाल्याचे सांगण्यात आले.विविध ठिकाणी गुन्हेदुचाकी चोरी प्रकरणात सदरबाजार पोलीस ठाणे, सिडको पोलीस ठाणे, चिकलठाणा पोलीस ठाणे, शेगाव पोलीस ठाण्यासह इतर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले.इंजिन नंबरची तपासणीपोलिसांनी ताब्यात घेतलेल्या दुचाकींचा चेसिस नंबर, इंजिन नंबर आरटीओ कार्यालयामार्फत तपासला जाणार आहे. या तपासणीनंतर या दुचाकी कोणाच्या मालकीच्या आहेत, हे समोर येईल, असे पोनि. यशवंत जाधव म्हणाले.