- पवन पवार वडीगोद्री ( जालना) : ओबीसी नेते प्रा. लक्ष्मणराव हाके, नवनाथ वाघमारे हे रविवार ता.07 रोजी वडीगोद्री येथे आले आसता त्यांनी अंतरवाली सराटी येथे सदिच्छा भेट दिली. मागील काही महिन्यांपासून मराठा आरक्षणाचे केंद्रबिंदू असलेल्या अंतरवाली सराटीत ओबीसी नेते हाके व वाघमारेच जल्लोषात स्वागत करण्यात आले. एकच पर्व ओबीसी सर्व, हाके साहेब तुम आगे बडो हम तुम्हारे साथ है, अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. यादरम्यान ओबीसी नेते हाके व वाघमारे यांचे महिलां व विद्यार्थीकडून औक्षण करण्यात आले.
प्रा.हाके आणि वाघमारे यांनी ग्रामस्थांच्या जोरदार स्वागतानअंतर गावात ठिकठिकाणी भेट देत ग्रामस्थांसोबत संवाद साधला. गावातील पढाई मंदिर, विठ्ठल रखुमाई मंदिर, श्रीकृष्ण मंदिर आदी ठिकाणी जाऊन दर्शन घेतले. गावातील नागरीकांनी फेरीमध्ये सहभाग घेतला. नुकतेच वडीगोद्री येथे ओबीसी आरक्षण बचाव करीता प्रा.लक्ष्मण हाके व नवनाथ वाघमारे यांनी उपोषण केले होते या वेळी अंतरवाली सराटी येथील ओबीसी समाज बांधवांनी मोठा सहभाग या ठिकाणी नोंदवला होता. याबद्दल प्रा.हाके, वाघमारे यांनी समाज बांधवाचे आभार व्यक्त केले. विद्यार्थी, युवक यांच्यासोबत अनेक विषयावर चर्चा केली. एकूणच लक्ष्मण हाके व नवनाथ वाघमारे यांनी बांधवांची भेट घेऊन संवाद साधल्याने अंतरवाली सराटीमधील ओबीसी बांधवात मोठा उत्साह पाहायला मिळाला.