मेंढरे यांची नियुक्ती
जालना : संभाजी ब्रिगेडच्या बदनापूर तालुका उपाध्यक्षपदी सोमठाणा येथील दिलीप मेंढरे यांची नियुक्ती करण्यात आली. जिल्हाध्यक्ष विजय वाढेकर यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. याप्रसंगी संतोष नागवे, गौतम गायकवाड, अंबादास नागवे, जगनाथ ठाकूर आदी उपस्थित होते.
विजेच्या लपंडावामुळे नागरिक हैराण
आष्टी : वीज ग्राहकांना गरजेनुसार सेवा मिळावी म्हणून राज्य शासनाच्या वतीने महावितरणच्या माध्यमातून शहरासह ग्रामीण भागात वीजपुरवठा करण्यासाठी विद्युत उपकेंद्राची निर्मिती वाढवण्यात आली. मात्र ग्रामीण भागात वीजपुरवठा करणाऱ्या उपकेंद्रातील पदे रिक्त असल्याने विजेचा खेळखंडोबा सुरू आहे. आष्टी व परिसरात सतत विजेचा लपंडाव सुरू असल्याने नागरिक हैराण झाले आहेत.
नाभिक सेवा संघाचे मागण्यांचे निवेदन
जालना : छत्रपती शिवाजी महाराजांचे अत्यंत विश्वासू मावळे शूरवीर जिवाजी महाले यांचे नाव औरंगाबाद येथील विभागीय क्रीडा संकुलास देण्यात यावे, अशी मागणी नाभिक सेवा संघाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे करण्यात आली आहे. या निवेदनावर माधव भाले, कृष्णा पंडित, गणेश वाघमारे, सेनाजी काळे, विजय अवधूते, आबासाहेब बोरुडे, संतोष पवार, विजय तोडकर आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
पाथ्रुड तांडा येथे कृषी दिन साजरा
जालना : जालना तालुक्यातील पाथ्रुड तांडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत हरित क्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जयंती साजरी करण्यात आली. प्रारंभी वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. या वेळी संतोष राठोड, श्याम राठोड, रामेश्वर राठोड, वसंत पवार, सतीश श्रीखंडे, मुख्याध्यापक नारायण माहोरे आदी उपस्थित होते.
देवगाव खवणे येथे बसविले हायमास्ट दिवे
मंठा : तालुक्यातील देवगाव खवणे येथे पंचायत समिती सदस्य किसन मोरे यांच्या पुढाकाराने उपलब्ध करण्यात आलेल्या निधीतून मारोती मंदिर, जगदंबा देवी मंदिर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर अशा तीन ठिकाणी हायमास्ट दिवे बसविण्यात आले आहेत. या प्रसंगी किसन मोरे, उपसरपंच वंदना मोरे, भगवान खवणे, बंडू मोरे, जीवन चिंतामणी, ध्रुव मोरे, कैलास मोरे, नाना दहीजे आदी उपस्थित होते.
रोहिलागड येथे आरोग्य कर्मचाऱ्यांचा सत्कार
अंबड : रोहिलागड येथे ‘डॉक्टर डे’निमित्त ग्रामपंचायतीच्या आरोग्यसेविका, आरोग्यसेवक, आशासेविका, अंगणवाडी कर्मचारी व शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी सरपंच करुणा पाटील, ॲड. श्यामसुंदर पाटील, ग्रामसेवक बागुल, उपसरपंच नंदाबाई टकले, ग्रामपंचायत सदस्य मंजीत टकले, सतीश होलगे, आरोग्य सेवक डॉ. नरवडे यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.
बंजारा क्रांती दलातर्फे वृक्षारोपण
मंठा : हरित क्रांतीचे प्रणेते मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त बंजारा क्रांती दलाच्या वतीने बाजार समिती परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. या वेळी बंजारा क्रांती दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष देवीदास राठोड, भारतीय जनता पक्ष महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष जिजाबाई जाधव, सुभाष राठोड, जगदीश राठोड, जिल्हाध्यक्ष राम जाधव, कैलास चव्हाण, रमेश चव्हाण आदी उपस्थित होते.