शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
3
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
4
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
5
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
6
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
7
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
8
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
9
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
10
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
11
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
12
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
13
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
14
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
15
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
16
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
17
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
18
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
19
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?

दोन हजार कर्मचाऱ्यांना निवडणूक प्रशिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2019 12:41 AM

भोकरदन मतदार संघांतील तब्बल दोन हजार ४६ कर्मचाऱ्यांना लोकसभा निवडणुकीसंदर्भात शनिवारी आणि रविवारी प्रशिक्षण देण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कभोकरदन : भोकरदन मतदार संघांतील तब्बल दोन हजार ४६ कर्मचाऱ्यांना लोकसभा निवडणुकीसंदर्भात शनिवारी आणि रविवारी प्रशिक्षण देण्यात आले. दोन दिवसात झालेल्या प्रशिक्षणासाठी गैरहजर राहिलेल्या २९ कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटिसा देण्यात आल्या आहेत.या प्रशिक्षणा दरम्यान जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी रवींद्र बिनवडे यांनी रविवारी दुपारी प्रत्यक्ष भेट देऊन प्रशिक्षणाचा आढावा घेऊन, प्रशिक्षणार्थींना मतदान यंत्राची हाताळणी कशी करावी, या बद्दल प्रात्यक्षिक स्वरूपात माहिती दिली. तत्पूर्वी त्यांनी स्ट्राँगरूमला भेट देऊन पाहणी केली.२३ एप्रिलला जालना लोकसभा मतदार संघाचे मतदान होणार आहे. निवडणूक आयोगाने या निवडणुकीत व्हीव्हीपॅट मशिनचा पहिल्यांदा समावेश केला आहे. यामुळे याची माहिती कर्मचा-यांना देण्यात आली. व मतदानाच्या वेळी सर्वांनी सतर्क राहून आपले कार्य चोख बजावण्याचे आदेश जिल्हाधिका-यांनी प्रशिक्षणार्थींना दिले.दोन दिवस शनिवार व रविवार चार टप्प्यात सकाळी दहा ते दोन व दुपारी दोन ते सहा या वेळी उपविभागीय अधिकारी तथा सहाय्यक निवडणूक अधिकारी शिवकुमार स्वामी, तहसीलदार संतोष गोरड तहसीलदार जे. डी. वळवी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण देण्यात आले.मतदानाच्या एक दिवस अगोदर निवडणूक साहित्य ताब्यात घेणे, मतदानाच्या दिवशी प्रत्यक्ष मतदान आणि मतदान संपल्यावर करावयाची कामे या संदर्भात सविस्तर माहिती देण्यात आली.दाम्पत्याची ‘तडजोड’भोकरदन शहरात निवडणूक प्रशिक्षण सुरु असताना शिक्षिका एम. बी. फोले या प्रक्षिशणात असताना त्यांचे पती आर. के. खोकले हे आपल्या आठ महिन्याच्या मुलाचा सांभाळ करीत मंडपा बाहेर होते. त्यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, पहिल्या सत्रात माझे प्रशिक्षण झाले. तेव्हा ती मुलासोबत होती. आता तिचे प्रशिक्षण सुरु आहे. त्यामुळे मी मुलाचा सांभाळ करीत आहे.बदनापुरात निवडणूक अधिका-यांना प्रशिक्षणबदनापूर : बदनापूर विधानसभा मतदारसंघातील निवडणूक प्रशिक्षण कार्यक्रम येथील कृषी महाविद्यालयाच्या प्रांगणात व सभागृहात सहनिवडणूक निर्णय अधिकारी गणेश नि-हाळी, तहसीलदार छाया पवार यांच्या उपस्थित पार पडला. या प्रशिक्षण सत्रात जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी भेट देऊन उपस्थित मतदान अधिका-यांना मार्गदर्शन केले.लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांची प्रशासनाने तयारी सुरू केली असून, बदनापूर- अंबड विधानसभा क्षेत्रातील मतदान अधिकारी- कर्मचा-यांचे प्रशिक्षण येथील कृषी महाविद्यालयाच्या प्रांगणात शनिवार व रविवार दोन सत्रात पार पडले. शनिवारी मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी क्रमांक एकचे प्रशिक्षण झाले. तर रविवारी मतदान अधिकारी दोन व तीन यांना प्रशिक्षण देण्यात आले. यात सहा.निवडणूक निर्णय अधिकारी गणेश नि-हाळी व सहाय्यक सहनिवडणूक निर्णय अधिकारी छाया पवार यांनी मार्गदर्शन करून मतदान अधिका-यांना प्रशिक्षित केले. यावेळी एलईडी संचावर पीपीटीच्या माध्यमातून प्रशिक्षण देण्यात आले.या प्रशिक्षणास गैरहजर कर्मचा-यांना नोटीस बजावली आहे.परतुरात दुस-या दिवशी प्रशिक्षणपरतूर : परभणी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सलग दुस-या दिवशी अधिकारी, कर्मचारी यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. यात २ हजार ५४ कर्मचा-यांना प्रशिक्षित करण्यात आले आहे.परभणी लोकसभा निवडणुकीसाठी प्रशासनातर्फे जय्यत तयारी करण्यात येत आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अधिकारी, कर्मचा-यांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. येथील जवाहर नवोदय विद्यालयात आयोजित प्रशिक्षणात शनिवार व रविवार या दोन दिवसांत दोन हजार ५४ अधिकारी, कर्मचा-यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. ईव्हीएम व व्हीव्हीपॅट मशीन प्रत्यक्ष हाताळण्याचा अनुभव या प्रशिक्षणात कर्मचा-यांनी घेतला. यावेळी निवडणुकीतील विविध जबाबदा-या पार पाडण्यासाठी १७ कक्षांची स्थापना करण्यात आली. या प्रशिक्षणात सहायक निवडणूक निर्णय अधिकारी ब्रिजेश पाटील, तहसीलदार राजाभाऊ कदम यांनी मार्गदर्शन केले. या प्रसंगी नायब तहसीलदार विजय दावणगावकर, सुरेखा कोटूरकर, पी. पी. निकाळजे, धनश्री भालचीम, संजय कास्तोडे, भगवान चव्हाण, अनिल शिंगाडे, परांडे, दंतेवाड आदींची उपस्थिती होती.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकGovernmentसरकार