लोकमत न्यूज नेटवर्कजालना : येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनात दलित समाजतील विद्यार्थ्यांसाठी उभारण्यात आलेल्या संगणक प्रशिक्षण केंद्र आणि अभ्यासिकामध्ये प्रशासनाने निवडणुकीचे साहित्य ठेवल्याने विद्यार्थ्यांना ज्ञानार्जन करण्यास अडचणी येत असल्याने विविध दलित संघटनेच्या वतीने संताप व्यक्त केला.दलित समाजातील विद्यार्थ्यांना संगणकाचे ज्ञान मिळावे यासाठी समाजकल्याण विभागाकडून येथील सामाजिक न्याय भवन येथे सुसज्ज संगणक प्रशिक्षण केंद्र सुरु करण्यात आले आहे. केंद्र बंद करुन त्याजागी लोकसभा निवडणुकीचे साहित्य ठेवल्याने विद्यार्थी प्रशिक्षणपासून वंचित राहत आहेत. तसेच येथील अभ्यासिकासुध्दा बंद असल्याने आम्ही ज्ञानार्जन कुठे करावे, अशी विचारणा विद्यार्थ्यांनी केली आहे. या सर्व प्रकाराची जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशी करुन दोषीविरुध्द कारवाई करण्याची मागणी रिपब्लिकन सेनेचे अॅड. शिवाजी आदमाने, मातंग मुक्ती सेनेचे अशोक साबळे, रिपाईचे किशोर मघाडे, भीमसेना पँथर्सचे मधुकर घेवंदे यांनी केली आहे. तसेच येथील कामगार अधिकारी कार्यालयात कामगार, मजुरांची अडवणूक बंद करावी, कामगारांना त्यांचे अनुदान वाटप करण्याची मागणी निवेदनाव्दारे केली आहे.याविषयी सहायक समाजकल्याण अधिकारी बलभीम शिंदे यांना विचारले असता, ते म्हणाले की येथील संगणक प्रशिक्षण केंद्र अद्यापही सुरू नाही. केवळ फर्निचर हटवून मशीन व अन्य साहित्य तेथै ठेवले आहे.
अभ्यासिकेमध्ये निवडणुकीचे साहित्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2019 12:49 AM