जालना : इलेक्ट्रिसिटी अॅक्टमध्ये संशोधनाचा विरोध यासह प्रलंबित मागण्यासाठी महावितरण अधिकारी, कर्मचारी संघटनेच्यावतीने आजपासून संप पुकारण्यात आला आहे. या मागण्यांच्यासाठी महावितरण कंपनीच्या मुख्य कार्यालयासमोर कर्मचाऱ्यांनी आज दुपारी निदर्शने केली.
७ ते ९ जानेवारी पर्यंत महावितरण कंपनीच्या अधिकारी व कर्मचारी संघटनांच्यावतीने विविध मागण्यासाठी राज्यभर संप पुकारण्यात येणार आहेत. यात इलेक्ट्रिकसिटी अॅक्टमध्ये संशोधनाचा विरोध, महावितरणच्या पुनर्रचनेबाबत दिलेल्या सूचनांवर अंमलबजावणी व्हावी, महापारेषणमध्ये मंजूर पद कमी करण्यात येऊ नयेत, फ्रेन्चाइसीवर रोख लालावी या प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत.
या संपात महा.स्टेट इले. वर्कर्स, फेडरेशन, सबॉडीनेट असोसिएशन, मरा. वीज तांत्रिक कामगार संघटना, महाराष्ट्र राज्य वीज कामगार काँग्रेस, विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनिअन, महा. वीज कामगार महासंघ या संघटनांनी सहभाग घेतला.