शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
2
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
3
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
4
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
5
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
6
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
8
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
9
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
10
तणाव वाढला! मणिपूरमध्ये ‘एनपीपी’ने काढला सरकारचा पाठिंबा; काँग्रेस आमदारांची राजीनाम्याची तयारी
11
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
12
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
13
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
14
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
15
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
16
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
17
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
18
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
19
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
20
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात

मंठावासियांच्या तोंडचे पाणी पळाले !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2018 12:48 AM

अठरा लाखांचा वीजबिल भरणा थकल्याने महावितरणने मंठा शहराच्या पाणीपुरवठा योजनेचा वीजपुरवठा खंडित केला आहे. त्यामुळे शहरातील पाणीपुरवठा तीन दिवसांपासून ठप्प असून, नागरिकांचे पाण्यासाठी हाल सुरू आहेत.

मंठा : अठरा लाखांचा वीजबिल भरणा थकल्याने महावितरणने मंठा शहराच्या पाणीपुरवठा योजनेचा वीजपुरवठा खंडित केला आहे. त्यामुळे शहरातील पाणीपुरवठा तीन दिवसांपासून ठप्प असून, नागरिकांचे पाण्यासाठी हाल सुरू आहेत.मंठा शहराला पाणीपुरवठा करणा-या नळयोजनेचा विद्युत पुरवठा शनिवारी वीज बिल न भरल्यामुळे तोडण्यात आला. नगरपंचायत प्रशासनाला वारंवार सूचना देऊनही वीज बिल न भरल्यामुळे वीजपुरवठा खंडित करावा लागला, असे शाखा अभियंता पी.पी. खंडागळे यांनी सांगितले. एकीकडे शहरातील नागरिकांची पाण्यासाठी भटकंती सुरू असताना नगरपालिकेतील सत्ताधारी व विरोध आरोप-प्रत्यारोपाचे राजकारण करीत आहेत. एकूण थकबाकीपैकी चार लाखांचे बिल भरण्याचे नियोजन केले असून, दोन दिवसात शहराचा पाणीपुरवठा सुरळीत होईल, असे नगराध्यक्षा पार्वती बोराडे यांनी सांगितले. तर शिवसेनेने विरोध केल्याने वीज बिल भरणा करण्यास विलंब झाला. त्यामुळे नागरिकांवर ही वेळ आल्याचा आरोप काँग्रेसचे गटनेते शिराज पठाण यांनी केला. उपनगराध्यक्ष बालासाहेब बोराडे म्हणाले, की आपण मुख्याधिकारी व्होरकर यांना याबाबत जिल्हाधिका-यांची भेट घेऊन चर्चा करून वीज बिल भरण्याबाबत तरतूद करण्यास सांगितले. शिवसेनेची भूमिका सकारात्मक असल्यावे सांगून त्यांनी काँग्रेसने केलेले आरोप फेटाळले.