लोकमत न्यूज नेटवर्ककुंभार पिंपळगाव : घनसावंगी तालुक्यात मानव विकासच्या बस येत नसल्याने विद्यार्थिनींसाठी असलेल्या योजनेचा बोऱ्या वाजला आहे. कुंभारपिंपळगाव परिसरातील विद्यार्थिनींना खाजगी गाड्याने धोकादायक प्रवास करावा लागत असल्याने पालकात संताप आहे.परिसरात मानव विकास मिशनची बस बंद असल्याने या विभागावतीने परिसरात सप्टेंबर महिन्यात सर्व्हे करण्यात आला होता. त्या सर्वे नुसार परिसरात विद्यार्थींनीची संख्या बघता बसेस संख्या वाढविणे प्रस्तावित करण्यात आले होते, परंतु तीन महिने व्हायला आले तरी एकही बस वाढविण्यात आलेली नाही.घनसावंगी तालुक्यात मुलींच्या शिक्षणासाठी मानव विकासच्या सात बसेस सूरु असून ततालुक्यात एकूण तेराशे विद्यार्थींनी मानव विकास मिशन अंतर्गत बस पास काढली आहे. तर अहिल्याबाई होळकर योजनेतून सुमारे पाचशे विद्यार्थी ने पास काढलेले आहेत एकूण १८५० विद्यार्थ्यांनीना पुरेल असे एकूण सतरा बसेस ची आवश्यता असून १७ ऐवजी सातच बसेस सुरू आहेत. त्यामुळे असंख्य मुलीचे शिक्षणाची हेळसाळ होत आहे. त्यातच कुंभारपिंळगावात बस येत नसल्याने गैरसोय होत आहे.
मानव विकास मिशन योजनेचा बोजवारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2018 11:57 PM