शहरं
Join us  
Trending Stories
1
"अशोक चव्हाणांना काँग्रेसने दोनदा मुख्यमंत्रीपद दिले पण पक्ष संकटात असताना ते भाजपात गेले"
2
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात
3
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
4
WPL 2025 Retention: स्मृती ते हरनमप्रीत! इथं पाहा ५ संघातील रिटेन-रिलीज खेळाडूंची संपूर्ण यादी
5
"राजसाहेब तुम्हाला खरंच बडव्यांनी घेरलंय, सावध रहा"; ठाकरे गटात गेलेल्या अखिल चित्रेंचा इशारा
6
मुंबईत एकनाथ शिंदे - उद्धव ठाकरेंमध्ये कोण वरचढ?; 'या' ११ जागा ठरणार निर्णायक
7
AUS vs IND : 'ते' विसरा त्यांनी १५ वर्षांत स्वत:ला सिद्ध केलंय; कपिल देव यांची विराट-रोहितसाठी बॅटिंग
8
"धारावीची पुनर्निविदा काढून भूखंड गिळण्याचा ठाकरेंचा प्रयत्न"; आशिष शेलारांचा गंभीर आरोप
9
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?
10
रिटायर्ड जजच्या घरात चोरी; ग्रामस्थांना पाहताच चोरांनी काढला पळ, तलावात पडून एकाचा मृत्यू
11
CSK ची टीम इंडियाशी गद्दारी? Rachin Ravindra च्या मुद्यावरुन उथप्पाची 'सटकली'
12
"महाराष्ट्र लुटेंगे और हमारे दोस्तोंको बाटेंगे हा भाजपचा अजेंडो"; अमरावतीमध्ये उद्धव ठाकरेंची बोचरी टीका
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: नवाब मलिकांना भाजपाचा विरोध, अजित पवार मलिकांसाठी मैदानात, थेट रोड शोमध्ये दाखल
14
भाजपने खोटी जाहिरात छापून आणली; काँग्रेसची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार 
15
एकनाथ शिंदे विधानसभा निवडणूक लढणार नव्हते, पण...; नरेश म्हस्केंचा गौप्यस्फोट
16
"उगाच काही सांगायचं, पटेल असं तरी..."; विरोधकांच्या योजना किती कोटींपर्यत जातायत? अजित दादांनी गणितच सांगितलं
17
प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळ्याच्या बैठकीत राडा; साधुसंतांनी एकमेकांवर चालविल्या लाथाबुक्क्या
18
"याबाबत फडणवीस यांचं काय मत आहे?"; फोटो दाखवत पृथ्वीराज चव्हाणांचा सवाल
19
नवऱ्याला सोडलं अन् बॉयफ्रेंडशी लग्न ठरवलं; वधू वाट पाहत होती पण वरात आलीच नाही, कारण...
20
भारतीय अधिकाऱ्यांनी घेतली अफगाणी संरक्षण मंत्र्याची भेट; पाकिस्तानची उडाली झोप...

निवडणुकीनंतर उमेदवारांचा आरामासह आढाव्यावर भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2019 12:52 AM

गेल्या दोन महिन्यांपासून निवडणुकांच्या या-ना त्या कामात गुंतलेल्या नेत्यांनी सोमवारी मतदान झाल्यावर सुटकेचा श्वास घेतला.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : गेल्या दोन महिन्यांपासून निवडणुकांच्या या-ना त्या कामात गुंतलेल्या नेत्यांनी सोमवारी मतदान झाल्यावर सुटकेचा श्वास घेतला. मतदाना नंतरचा दुसरा दिवस अर्थात मंगळवारी जवळपास सर्व नेते तसेच पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आरामाला प्राधान्य दिले. एरवी सकाळी सातच्या आत बाहेर पडणाऱ्या नेत्यांच्या गाड्या तसेच त्यांच्या बंगल्यासमोर जमणारी गर्दी आज दिसून आली नाही. अनेक नेत्यांचा दिवस हा दुपारी एक वाजेनंतरच सुरू झाला. दिवसभर अत्यंत आरामदायी पध्दतीने त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधून मतदानाचा आढावा घेतला.जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदारसंघात सोमवारी मतदान पार पडले. यासाठी दोन ते तीन महिन्यांपूर्वीपासूनच नेत्यांची मोर्चे बांधणी सुरू होती.मंगळवारी जालन्यातील शिवसेनचे उमेदवार अर्जुन खोतकर यांनी सर्व कार्यकर्त्यांना आराम करण्याचा सल्ला देऊन स्वत: देखील १२ वाजेनंतर बाहेर पडणे पसंद केले. दुपारनंतर त्यांनी त्यांच्या जवळच्या मित्र तसेच नातेवाईकांकडे जाऊन एकूण परिस्थितीवर चर्चा केली. आलेल्या कार्यर्त्यांकडून कुठे कसे मतदान झाले याचा आढावा घेतला. काँग्रेसचे उमेदवार कैलास गोरंट्याल यांनी हाच कित्ता गिरवला.घनसावंगी मतदारसंघातील उमेदवार राजेश टोपे यांनीही सकाळी पाथरवाला येथील निवासस्थानी थांबून घरी आलेल्या पदाधिकारी, कार्यत्यााच्या भेटी घेतल्या. तसेच सायंकाळी मुंबईला आईला भेटण्यासाठी रवाना झाल्याचे सांगण्यात आले. निवडणूकीच्या धामधूमित आई आजारी असतांनाही भेटीला जाता आले नसल्याची खंत आ. राजेश टोपे यांनी बोलून दाखवली.भोकरदन विधानसभेचे भाजपचे उमेदवार संतोष दानवे आणि त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार माजी आ. चंद्रकांत दानवे यांनी दुपारनंतर घरी आलेल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधून मतदानाचा आढावा घेतला. त्यांचाही दिवस उशिराच सुरू झाला. बदनापूर मतदारसंघातील भाजपचे उमेदवार आ. नारायण कुचे यांनी देखील बदनापूर तसेच अंबडसह अनेक गावात भेटी दिल्या. त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार बबलू चौधरी यांनी जालन्यातून सकाळी उशिरा बदनापूरला जाऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधला. परतूर मतदार संघात पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी दुपारनंतर कार्यकर्त्यांच्या भेटी घेऊन आढावा घेतला. तसेच त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार सुरेशकुमार जेथलिया हे दिवसभर परतूरमध्येच होते. त्यांनीही कार्यर्त्यांच्या भेटी घेतल्या.मतदारांनी त्यांचा हक्क बजावला आहे, आता गुरूवारीच काय ते चित्र स्पष्ट होणार असले तरी अनेक तर्कवितर्क लावले जात असल्याचे सांगण्यात आले. या निवडणुकीत टोपे विरूध्द सर्व असे समीकरण या मतदारसंघात दिसून आले. त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार हिकमत उढाण हे मंगळवारी घनसावंगीतच होते.नेहमीपेक्षा त्यांचा दिवस थोडा उशिराने सुरू झाला होता. त्यांनी आंतरवाली टेंभी, उकडगाव, रांजणी तसेच जालन्यातील जिल्हा सरकारी रूग्णालयास भेट दिली. या रूग्णालयात एका जखमी कार्यकर्त्याची त्यांनी आस्थेवाईकपणे चौकशी केली.

टॅग्स :Assembly Election 2019विधानसभा निवडणूक 2019Politicsराजकारण