लोकमत न्यूज नेटवर्कपरतूर : शहरातील अतिक्रमण काढण्याची मोहीम नगरपालिकेने हाती घेतली असून गुरुवारी मुख्य रस्त्यावरील अतिक्रमणे नगरपालिकेच्या पथकाने काढली. कारवाई सुरू झाल्यानंतर काही नागरिकांनी स्वत:हून आपली दुकाने हटवली.परतूर शहरातील आष्टी रेल्वेगेट, तहसील कार्यालय दरम्यान रोडवरील अतिक्रमण हटवण्याची मोहीम नगरपालिकेने हाती घेतली आहे. सकाळी नऊ वाजता या मोहिमेला सुरुवात झाली. न. प. चे पथक जेसीबी व ट्रॅक्टरसह पोलिस बंदोबस्तात रस्त्यावर उतरताच अतिक्रमणधारकांची धावपळ उडाली. काही जणांनी स्वत: अतिक्रमण काढून घेतले.नगरपालिकेच्या पथकाने जेसीबीच्या साहाय्याने पथकाच्या मदतीने अतिक्रमण काढले. अतिक्रमणात केवळ नाल्यावरील ओटे, बांधकाम, शेड, संरक्षक भिंती तोडण्यात आल्या. दिवसभराच्या कारवाईत रस्त्याच्या एका बाजूचे अतिक्रमण काढण्यात आले. ही मोहीम तीन दिवस चालणार आहे. आष्टी रेल्वे गेटपासून ते महादेव मंदिर दरम्यान ७० फुटांचा, तसेच पुढे ५० फुटांचा रस्ता होत असल्याचे सूत्रांनी सांगितले. उड्डाण पुलाच्या कामाबरोबरच रस्त्याचेही काम करण्यात येणार असल्याने अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यात येत आहे. या पथकात मुख्याधिकारी गंगाधर ईरलोड, मनोहर तुंगनवार, अतूल देशपांडे, रवी देशपांडे, खनपटे, अनिल पारीख, अजगर अली, शिवदास चव्हाण, पोलीस निरीक्षक आर. टी. रेंगे, उपनिरीक्षक विजय जाधव, पो. कॉ. प्रल्हाद गुंजकर, भीमराव राठोड, एम. पी. सुरडकर, दुसाने, सोळंके, शाम गायके, चंपालाल घुसिंगे यांनी बंदोबस्त ठेवला.
परतुरातील अतिक्रमणांवर हातोडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2017 12:49 AM