लोकमत न्यूज नेटवर्कजालना : गणरायाच्या आगमनापासून पडणाऱ्या पावसामुळे गणेशोत्सवाची धूम चांगलीच रंगली आहे. चालू वर्षी जिल्ह्यात १५६९ सार्वजनिक गणेश मंडळांनी श्रींची स्थापना केली आहे. यात ९२३ मंडळांनी पोलिसांचा परवाना घेतला आहे. तर २१५ गावात एक गाव एक गणपती ही संकल्पना प्रत्यक्षात उतरली आहे.यंदाचा गणेशोत्सव शांततेत पार पडावा, एक गाव- एक गणपती, एक वॉर्ड एक गणपती ही संकल्पना अधिकाधिक मंडळांनी राबवावी, यासाठी पोलीस अधीक्षक एस. चैतन्य यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेस्तरावरील अधिकाऱ्यांनी ठिकठिकाणी बैठका घेतल्या होत्या. पावसाअभावी गणेशोत्सवावरही दुष्काळाचे सावट होते. मात्र, गणरायाच्या आगमनापासून जिल्ह्यात सातत्याने कमी- अधिक प्रमाणात पाऊस होत आहे. त्यामुळे गणेशोत्सवातील उत्साहही वाढला आहे. जिल्ह्यातील १८ पोलीस ठाण्यांतर्गत १५६९ सार्वजनिक गणेश मंडळांनी श्रींची प्रतिष्ठापना केली आहे. यात (कंसातील आकडेवारी एक गाव- एक गणपतीचे) सदरबाजार ठाण्यांतर्गत ११८ गणेश मंडळांनी श्रींची प्रतिष्ठापना केली असून, १०१ मंडळे परवानाधारक आहेत. कदीम ठाण्यांतर्गत असलेल्या ४८ पैकी ३० मंडळांनी परवाना घेतला आहे. तालुका जालना ठाण्यांतर्गत असलेल्या १६५ पैकी २१ (१५ एक गावात एक गणपती) मंडळांनी परवाना घेतला आहे. चंदनझिरा ठाण्यांतर्गत असलेल्या ५५ पैकी ३५ (०५) मंडळांनी परवाना घेतला आहे. बदनापूर ठाण्यांतर्गत असलेल्या ८३ पैकी ७३ (२३) मंडळांनी परवाना घेतला आहे. अंबड ठाण्यांतर्गत असलेल्या १३२ पैकी ९० (१९) मंडळांनी परवाना घेतला आहे. गोंदी ठाण्यांतर्गत असलेल्या ८५ पैकी ५८ (३) मंडळांनी परवाना घेतला आहे. घनसावंगी ठाण्यांतर्गत असलेल्या ८२ पैकी ५० मंडळांनी परवाना घेतला आहे. परतूर ठाण्यांतर्गत असलेल्या ११४ पैकी ४५ (३१) मंडळांनी परवाना घेतला आहे. आष्टी ठाण्यांतर्गत असलेल्या ७७ पैकी ४५ (९) मंडळांनी परवाना घेतला आहे. मंठा ठाण्यांतर्गत असलेल्या ८६ पैकी ६६ (१५) मंडळांनी परवाना घेतला आहे. सेवली ठाण्यांतर्गत असलेल्या ४२ पैकी ३२ (१५) मंडळांनी परवाना घेतला आहे.जिल्ह्यात ६४६ मंडळे विना परवाना असल्याची नोंद पोलिसांकडे आहे. यात सदरबाजार ठाण्यांतर्गत १७, कदीम- १८, तालुका जालना १४४, चंदनझिरा २०, बदनापूर- १०, अंबड- ४२, गोंदी- २७, घनसावंगी ३२, परतूर ६९, आष्टी ३२, मंठा २०, सेवली १०, मौजपुरी ६८, भोकरदन ५५, जाफराबाद १७, हसनाबाद ३१, टेंभुर्णी १४, पारध ठाण्यांतर्गत २० मंडळांनी विना परवाना श्रींची स्थापना केली आहे.
जालना जिल्ह्यात १५६९ सार्वजनिक गणेश मंडळांची स्थापना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 05, 2019 1:03 AM