लोकमत न्यूज नेटवर्कजालना : यंदाची निवडणूक ईव्हीएमसह व्हीव्हीपॅटमुळे वैशिष्ट्यपूर्ण ठरणार आहे. व्हीव्हीपॅट व मतदान प्रक्रियेबाबत विविध माध्यमांतून जनजागृती केली जात आहे. नव्या यंत्रणेबाबत मतदारांमध्ये विश्वासार्हता निर्माण करण्यापासून ते निवडणूक पार पडून निकाल जाहीर होईपर्यंतच्या प्रत्येक टप्प्याचे नियोजन जिल्हा प्रशासनाने केले.जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी गत महिनाभरात सतत बैठका घेऊन व पाठपुरावा करुन निवडणूक प्रक्रियेत सर्व विभागांच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना सहभागी केले आहे. उपजिल्हा निवडणूक अधिकारी राजू नंदकर यांनी सर्व यंत्रणांमध्ये समन्वय साधत निवडणूक कार्यक्रम राबवत आहेत.कामांनुसार विभाग प्रमुखांकडे नोडल अधिका-याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. अटऋ सुविधा कक्ष ( जालना व भोकरदन) साठी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक सुरेश बेदमुथा यांना तर परतूर, घनसावंगी व बदनापुरसाठी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांना नोडल म्हणून नेमण्यात आले आहे. आचारसंहिता व कायदा व सुव्यवस्था कक्षा कक्षासाठी सोहम वायाळ, निवासी उपजिल्हाधिकारी, निवडणूक खर्च नियंत्रण कक्षासाठी नोडल म्हणून जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी उत्तम चव्हाण, नामनिर्देशन कक्षासाठी उप विभागीय अधिकारी केशव नेटके, मनुष्यबळ व्यवस्थापन व ईव्हीएम-व्हीव्हीपॅट कक्षासाठी उपजिल्हाधिकारी (निवडणूक) राजीव नंदकर, वाहतुक व्यवस्थापन कक्षासाठी ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता डाकुरे व उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्र्काळे, निवडणूक साहित्य कक्षासठी तहसिलदार संतोष बनकर, स्वीप कक्षासाठी जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय इंगळे, तक्रार निवारण कक्षासाठी जिल्हा महिला व बालकल्याण अधिकारी संगीता लोंढे, पोस्टल बॅलेट कक्षासाठी लोकल फंडचे सहाय्यक संचालक चंद्रकांत पाटील, निवडणूक निरीक्षकांचे संपर्क अधिकारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी नामदेव केंद्रे, निवडणूक निरीक्षक अहवाल कक्षासाठी जिल्हा नियोजन अधिकारी वैभव कुलकर्णी, सी व्हीजील ?पसाठी सहाय्यक जिल्हा सुचना व विज्ञान अधिकारी उमेश सपकाळ, सुविधा-परवाना कक्षासाठी नगर परिषदेचे मुख्याधिकारी संतोष खांडेकर, प्रशिक्षणासाठी उप विभागीय अधिकारी शशिकांत हदगल, पीडब्ल्यू व्यवस्थापन कक्षासाठी समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त बलभीम शिंदे, माध्यम प्रमाणन व सनियंत्रण समिती कक्षासाठी जिल्हा माहिती अधिकारी व्ही.आर. थोरात, मायक्रो आॅब्जर्व्हर लिड बँक अधिकारी ईलमकर, जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापक खरात यांच्यासह सुधाळकर आणि अन्य अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित केली आहे.दिव्यांग मतदारांसाठी एक खिडकी कक्षजालना लोकसभा सार्वत्रिक निवडणुक झ्र 2019 च्या अनुषंगाने भारत निवडणुक आयोगाच्या निदेर्शानुसार दिव्यांग मतदारांच्या अडचणी व तक्रारीचे निराकरण करुन निवडणूक विषयक सेवा दिव्यांग मतदारांना जलद गतीने पुरविण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये एक खिडकी कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. हा कक्ष सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत सुरु राहणार असून दिव्यांग मतदारांनी मतदान विषयी त्यांच्या काही अडचणी असल्यास या कक्षाशी संपर्क साधावा.या कक्षाचे उद्घाटन नोडल अधिकारी तथा सहाय्यक आयुक्त समाज कल्याण बलभीम शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी या कक्षात नियुक्त करण्यात आलेल्या सहायक प्रशांत गायकवाड, शेलेंद्र कापसे, सच्चिदानंद काळगे, व्यंकट शिंदे, ढगे, नरेश बाले आदींची उपस्थिती होती असे जालना जिल्हा परिषद व जिल्हा समाज कल्याण अधिकाऱ्यांनी कळविले आहे.जालना लोकसभा मतदार संघाच्या सार्वजनिक निवडणुकीसाठी १९५० हा टोलफ्री क्रमांक आहे. या टोलफ्री क्रमांकावर मतदार संपर्क साधून मतदार यादीतील आपले नाव, मतदान केंद्र आदी बाबत माहिती घेतात. आतापर्यंत १३९४ मतदारांनी या संदर्भात चौकशी केली असल्याचेही नंदकर यांनी सांगितले.
विविध एकतीस कक्षांची स्थापना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 04, 2019 12:43 AM