लोकमत न्यूज नेटवर्कजाफराबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ अंतर्गत घेण्यात येणाऱ्या कला, वाणिज्य व विज्ञान शाखेच्या पदवी परीक्षांना बुधवारपासून सुरूवात होत आहे. परंतु, अद्याप विद्यार्थ्यांना महाविद्यालय स्तरावर ओळखपत्र उपलब्ध झालेले नाही. यामुळे विद्यार्थ्यांसह महाविद्यालय प्रशासनामधून नाराजी व्यक्त केली जात आहे.जाफराबाद तालुक्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाशी संलग्नित मान्यता प्राप्त असलेले सहा वरिष्ठ महाविद्यालयांची संख्या आहे. कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेच्या दुसरे, चौथे, आणि सहावे सेमिस्टर पदवी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या जवळपास पाच हजारांपेक्षा जास्त आहे. हीच परिस्थिती जालना जिल्ह्यात इतर महाविद्यालयाची झाली आहे.परीक्षा सुरळीत होण्यासाठी विद्यापीठाने आॅनलाईन प्रक्रिया सुरू केली आहे. विद्यापीठाने महाविद्यालयाकडून परीक्षा आवेदन पत्र व शुल्क भरण्यापासून ते सर्व कामे वेळेत करून घेत आहे. तरी सुद्धा वेळेत कोणतेच काम पूर्ण होत नाही. अशी कायम ओरड आहे. त्यामुळे याकडे विद्यापीठ परीक्षा विभागाचे लक्ष नाही का, अशी म्हणायची वेळ आली आहे. विद्यार्थ्यांना परीक्षा देण्यासाठी सोबत परीक्षा ओळखपत्र आवश्यक असतांना शुक्रवारी सायंकाळ पर्यंत ओळखपत्र महाविद्यालय स्तरावर उपलब्ध झाले नसल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.प्रशासनापुढे मोठा पेचपदवी परीक्षांच्या तारखा या पूर्वी १९ मार्च पासून सुरू होणार असे विद्यापीठ परीक्षा विभाग यांनी जाहीर केले होते. मात्र विद्यापीठाने परीक्षेच्या वेळापत्रकात अचानक बदल करत २७ मार्च ही तारीख निश्चित केली आहे. तारीख वाढली आहे. तरी देखील अजून विद्यार्थ्यांच्या हातात ओळखपत्र आले नाही. ओळखपत्र येणार कधी, आणि आले ते वाटप करणार कधी, या विषयी महाविद्यालय प्रशासन यांनी चिंता व्यक्त करत परीक्षा कशा घेणार, हा मोठा प्रश्न आहे. असे प्रतिपादन सिध्दार्थ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक काकडे यांनी केले.आॅनलाइन निकाल लागला, गुणपत्रक मिळाले नाहीआॅक्टोबर/ नोव्हेंबर महिन्यात घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल विद्यापीठाने आॅनलाइन जाहीर करून एक महिना होत आहे. परंतु, या परीक्षांमध्ये पास, नापास झालेल्या निकालाचे गुणपत्रक विद्यार्थ्यांना अद्याप मिळाले नाही. बुधवारपासून दुस-या सत्राच्या परीक्षेला सुरवात होत असतांना पहिल्या सत्रातील गुणपत्रक कधी मिळणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
दोन दिवसांवर परीक्षा तरीही ओळखपत्र मिळेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2019 12:29 AM