शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
2
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
3
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
4
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
5
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
6
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
7
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'
8
...म्हणून देशाची राजधानी दिल्लीतून दुसरीकडे हलवा, शशी थरूर यांनी दिला सल्ला
9
Vinod Tawde: विनोद तावडे ठाकुरांच्याच कारमधून एकत्र का गेले? हितेंद्र ठाकुरांनी सगळे सांगितले...
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "विरोधकांसाठी 'ही रात्र शेवटची, ही ...", महाराष्ट्रात 'कॅश फॉर व्होट'वर भाजपची प्रतिक्रिया
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"मला गोळ्या झाडा, मी मरणार नाही, तुम्हाला सोडणारही नाही"; हल्ल्यानंतर अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
12
अजबच! सहा हजारांच्या लाच प्रकरणी सरकारी कर्मचाऱ्याला निवृत्तीनंतर ५ वर्षांनी शिक्षा
13
भारताचा पाकिस्तानला चॅम्पियन्स ट्रॉफीआधी मोठा धक्का; अंध T20 वर्ल्ड कपकडेही फिरवली पाठ
14
Vinod Tawde: ज्या पैशांवरून राडा केला, ते माझे नाहीतच; ज्या खोलीत पैसे सापडले तिथे मी गेलोच नव्हतो : विनोद तावडे
15
"राहुलजी, याला पोरकटपणा म्हणायचं नाही तर काय..."; विनोद तावडे यांचे राहुल गांधींना चोख प्रत्युत्तर
16
हिटमॅनचा परफेक्ट फॅमिली मॅन सीन! बाबांचा बर्थडे सेलिब्रेट करताना दिसला रोहित शर्मा (VIDEO)
17
“विनोद तावडेंवर कारवाई करत निष्पक्ष असल्याचे निवडणूक आयोग दाखवणार का?”; काँग्रेसचा सवाल
18
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
19
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
20
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा

राज्यमंत्रिमंडळाचा विस्तार करा, रिपाइंला मंत्रिपद द्या; रामदास आठवले

By विजय मुंडे  | Published: August 30, 2023 5:32 PM

लोकसभेसाठी दोन, विधानसभेसाठी १२ जागांची मागणी एनडीएकडे करण्यात आल्याची माहिती

जालना : लोकसभा, विधानसभेच्या निवडणुका जवळ येत असून, त्यापूर्वी रखडलेला राज्यमंत्रिमंडळाचा विस्तार त्वरित करावा. रिपाइंला एक मंत्रिपद द्यावे, अशी आपली मागणी आहे. आगामी निवडणुकीच्या दृष्टीने लोकसभेसाठी दोन आणि विधानसभेसाठी १० ते १२ जागांची मागणी केल्याची माहिती रिपाइंचे अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिली.

जालना येथे बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. विरोधकांनी कितीही प्रयत्न केले तरी २०२४ च्या निवडणुकीत एनडीएला ३३० ते ३५० जागा मिळणार असून, विरोधक विरोधी बाकावर बसणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र शासनाने अनेक कल्याणकारी कामे केली असून, पुन्हा एनडीएच सत्तेत येईल, असा विश्वास आठवले यांनी व्यक्त केला. आगामी सर्वच निवडणुका एनडीए एकत्र लढणार आहे. त्यानुसार लाेकसभेसाठी दोन, विधानसभेसाठी १२ आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्येही जागांची मागणी करण्यात आली आहे. राज्य मंत्रिमंडळाचा लवकर विस्तार करावा, रिपाइंला मंत्रिपद द्यावे, अशी आपली मागणी आहे. शिवाय सामाजिक न्याय मंत्रिपद मुख्यमंत्र्यांकडे आहे. मुख्यमंत्र्यांकडे अनेक जबाबदाऱ्या असतात त्यामुळे सामाजिक न्याय विभागासाठी एक स्वतंत्र मंत्री द्यावा, अशी मागणी केल्याचेही ते म्हणाले. यावेळी महाराष्ट्र प्रदेश संघटन सचिव ॲड. ब्रम्हानंद चव्हाण, प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सरोदे, कार्याध्यक्ष बाबुराव कदम, युवक प्रदेशाध्यक्ष पप्पू कागदे, सुधाकर रत्नपारखे आदींची उपस्थिती होती.

आमदार सांभाळता आले नाहीत आता आकांडतांडव करतायतउद्धव ठाकरे यांना आमदार सांभाळता आले नाहीत आणि आता आकांडतांडव करतायत. शरद पवार यांचीही अवस्था तशीच आहे. पवार यांनी एनडीएत यावे, अशी भूमिका होती. परंतु, त्यांनी 'इंडियात' राहणे पसंत केले आहे. आमदार संभाळता न येणाऱ्यांनी आकांडतांडव न करता लोकांत जावे. लोकशाही आहे. मतदार योग्य व्यक्तीला संधी देतात, असेही ते म्हणाले.

कायद्यात बदल करणे म्हणजे संविधान बदलणे नव्हेसंविधान बदलले जात असल्याची चर्चा पसरविली जात आहे. एखाद्या कायद्यात बदल करणे म्हणजे संविधान बदल करणे असे होत नाही आणि संविधानात बदल होणार नाही. समान नागरी कायदा हा मुस्लीम विरोधी नसून, या कायद्यामुळे हिंदू - मुस्लीम दरी कमी होण्यास मदत होईल, असा विश्वासही आठवले यांनी व्यक्त केला. आठ लाखांच्या आत उत्पन्न असलेल्या मराठा समाज बांधवांना आरक्षण मिळावे, अशी आपली पूर्वीपासूनच मागणी असल्याचेही ते म्हणाले.

टॅग्स :Ramdas Athawaleरामदास आठवलेJalanaजालनाState Governmentराज्य सरकार