लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जिल्हा परिषदेच्या शाळांमधील शैक्षणिक गुणवत्तेकडे पाहण्याचा दृष्टीकोन मध्यंतरीच्या काळात चुकीचा झाला होता. परंतु हा गैरसमज काही उपक्रमशील शिक्षक तसेच गावकरी आणि त्या शाळांमधील शालेय व्यवस्थापन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी वेगवेगळे उप्रकम राबवून तो दूर करून त्यांच्या गावातील शाळांची गुणवत्ता वाढविली.त्यासाठी वेगवेगळे प्रयोगही केले. अशाच जिल्ह्यातील जवळपास ६१ प्रयोगशील शाळांची दखल लोकमतने हॅलो जालनामध्ये १८ जून ते १५ आॅगस्ट २०१९ मध्ये घेतली. त्या शाळांची माहिती इतरांना प्रेरणादायी ठरावी म्हणून याचे एक पुस्तक प्रसिध्द केले आहे. जे की, प्रत्येक शिक्षकाने आपल्याकडे संग्राह्य ठेवावे, असेच असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उत्तम वानखेडे यांनी केले.सोमवारी जिल्हा परिषेद एका छोटेखानी कार्यक्रमात लोकमतच्या प्रयोगशील शाळा या पुस्तकाचे विमोचन अध्यक्ष वानखेडेंच्या हस्ते करण्यात आले.यावेळी संपादक सुधीर महाजन, जाहिरात उपव्यवस्थापक सूरज धाये, जिल्हा प्रतिनिधी संजय देशमुख, शाखा व्यवस्थापक दीपक कदम, उपाध्यक्ष महेंद्र पवार, शिक्षण सभापती पूजा सपाटे, जि.प.सदस्य बाप्पासाहेब गोर्डे, माजी उपाध्यक्ष सतीश टोपे, जि.प. सदस्य शालीग्राम म्हस्के, जयमंगल जाधव आदींची उपस्थिती होती.माजी सभापती रघुनाथ तौर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी नामदेव केंद्रे आदींची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी पुढे बोलताना वानखेडे म्हणाले की, जिल्हा परिषदेच्या माध्यमातूनही पूर्वी दर्जेदार शिक्षण मिळत होते.मध्यंतरी या-ना त्या कारणाने या शाळांकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला होता.परंतु आता शिक्षणाचे महत्व सर्वांना पटले असून, अनेक शिक्षक आपल्यातील गुणवत्ता पणाला लावून शाळांची गुणवत्ता वाढवून विद्यार्थ्यांची चांगली पिढी निर्माण करत असल्याचे दिसून येते. लोकमत वृत्तपत्र समूहाने जालना जिल्हा परिषदेच्या उपक्रमशील शाळांची दखल घेतल्याबद्दल आभारही मानले.जिल्हाधिकाऱ्यांकडूनही स्वागतजालना जिल्हा परिषदेच्या प्रयोगशील शाळांची माहिती लोकमत ने प्रसिध्द करून शिक्षण क्षेत्राला महत्व दिले आहे. विशेष करून ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या शाळाही कुठेच मागे नाहीत, हेच या लेखमालेतून पुढे आले होते. या लेखमालेचे संकलित पुस्तक प्रसिध्द केल्याने ते जिल्हा परिषद तसेच अन्य अभ्यासू शिक्षकांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे. या पुस्तकाचे आपण स्वागत करतो, वृत्तपत्रांनी असे सामाजिक उपक्रम राबवून समाजात सकारात्मकता निर्माण होण्यात मोठे योगदान दिले आहे. त्यातच लोकमतने हा उपक्रम राबविणे म्हणजे जिल्हा परिषदेसाठी ही एक सन्मानाचीच बाब होय.- रवींद्र बिनवडे, जिल्हाधिकारी, जालना
‘प्रयोगशील शाळा’ जि.प.ची प्रतिमा उंचावेल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2020 12:21 AM