शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Assembly Election Result 2024: एकनाथ शिंदे आज राजीनामा देण्याची शक्यता; पुढील मुख्यमंत्री कोण? चर्चांना उधाण
2
मुख्यमंत्रि‍पदासाठी शिवसेना नेते आग्रही, पण शिंदेंचा कार्यकर्त्यांना महत्त्वाचा मेसेज; म्हणाले...
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक व व्यावसायिकदृष्टया फायदेशीर दिवस
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: भाजप २६.७७% मतांसह राज्यात नंबर वन; मविआत मतांमध्ये कोणता पक्ष ठरला सरस?
5
Maharashtra Assembly Election Result 2024: देवेंद्र फडणवीस, अमित शाहांची बैठक टळली; एकनाथ शिंदे-अजित पवार आज दिल्लीला जाणार
6
‘खरी शिवसेना कुणाची?’ याचा फैसला शेवटी झालाच! जे कुणाला जमलं नाही ते शिंदेंनी केलं
7
संविधान फक्त ‘नॅरेटिव्ह’पुरते?; संसद सभागृहातील गदारोळ हा अंतर्विरोध क्लेशकारक
8
आंबेडकरी विचारांची धार व धाक कुणी गमावला?; महाराष्ट्राचे, देशाचे राजकारण आता...
9
समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा महिनाभरात खुला; एमएसआरडीसीकडून कामांचा धडाका
10
साडेतीन हजार मालमत्ता होणार जप्त; कर न भरल्याने मुंबई महापालिकेची मोठी कारवाई
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: महायुतीत न जाता भाजपसोबत जाणे ही चूक; राज ठाकरेंसमोर पराभूत उमेदवारांची नाराजी
12
फेअर प्ले आयपीएलप्रकरणी मुंबई, ठाण्यासह  २१९ कोटींची मालमत्ता ईडीने केली जप्त
13
निवडणूक संपताच KDMC तील २ हजार कुटुंबांचे वास्तव्य धोक्यात; सामान्य बुडाले, बिल्डर मोकाट
14
राज्यभर हुडहुडी, थंडीचा कडाका जाणवणार; पुणे, नाशिक, महाबळेश्वरला थंडी वाढली
15
विराट म्हणाला, मी माझ्या गर्लफ्रेंडला आणू शकतो? रवि शास्त्रींनी BCCI चा नियमच बदलला होता!
16
विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरे गट आग्रही, पण मविआ एकत्रित दावा करू शकते का? कायदा काय सांगतो?
17
IPL Auction 2025: १३ वर्षांचा वैभव सूर्यवंशी झाला 'करोडपती'! राजस्थानने केलं 'रॉयल' स्वागत; किती लागली बोली?
18
IPL Auction 2025: Rohit Sharma ला 'ओपनिंग पार्टनर' मिळाला! Mumbai Indians ने ५.२५ कोटींना 'याला' संघात घेतला!
19
अमेरिकेतील 'या' शहरातून सूर्य गायब; आता थेट दोन महिन्यांनी होणार दर्शन, कारण...
20
अविमुक्‍तेश्‍वरानंद यांनी उद्धव ठाकरेंना दिला होता CM होण्याचा आशीर्वाद, आता सांगितलं माहायुतीच्या महाविजयाचं कारण 

वाळू माफियांचा कारनामा; जालन्यात २०० ब्रास अवैध वाळूची चोरी उघड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 03, 2021 7:16 PM

या अवैध वाळू उत्खननाकडे मंठा महसूल व पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष आहे.

ठळक मुद्देअवैध वाळूचोरी थांबणार कधी?

तळणी (जि. जालना) : मंठा तालुक्यातील पूर्णा नदीपात्रातून स्थानिक टेम्पोधारकांनी आठवडाभरात रात्रीतून २०० ब्रास अवैध वाळू उत्खनन करत चोरी केल्याचे उघड झाले आहे. तसेच गावात ठिकठिकाणी ४७ ब्रास अवैध वाळूसाठा आढळून आला. ही बाब उस्वद-तळणी तलाठ्यांच्या पंचनाम्यातून उघड झाली आहे.

मंठा तालुक्यातील पूर्णा नदीपात्रातील आठ वाळू घाटांची ऑनलाइन पद्धतीने लिलाव प्रक्रिया १५ जानेवारी रोजी पार पडली. त्यानंतर वाळू उपशासाठी ठेवलेले दर हे वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये वेगळे असल्याने मंठ्याच्या कंत्राटदारांनी या प्रक्रियेला न्यायालयात आव्हान दिले. यावर न्यायालयीन निर्णय येणार काय, या प्रतीक्षेपूर्वीच पूर्णा नदीपात्रातून अवैध वाळू उत्खनन सुरू झाले आहे. या अवैध वाळू उत्खननाकडे मंठा महसूल व पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. यामुळे रात्रीतून वाळूचोरी अन् दिवसा नुसते पंचनामे होणार का, यासह अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

रात्रीतून वाळू उत्खननपूर्णा नदीपात्रातून भुवन, पोखरी केंधळे, वाघाळा, टाकळखोपा, सासखेडा, लिंबखेडा, कानडी, देवठाणा-उस्वद येथील स्थानिक टेम्पोधारक थेट नदीपात्रातून अवैध वाळू उत्खनन करून वाहतूक करतात.

पंचनामा तहसील कार्यालयाकडे सादरयाबाबत तलाठी नितीन चिंचोले यांनी सांगितले की, पूर्णा नदीपात्रातून स्थानिक टेम्पोधारकांनी २०० ब्रास अवैध वाळू उत्खनन करून चोरी केली, तर गावात ठिकठिकाणी ४७ ब्रास अवैध वाळूसाठा केल्याचे आढळून आल्याचा पंचनामा ३० जानेवारी रोजी तहसीलकडे सादर केल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :JalanaजालनाsandवाळूCrime Newsगुन्हेगारी