शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेला बारामतीतून कोणी तिकीटच मागितले नाही; युगेंद्र पवारांना उमेदवारी का दिली, सुप्रिया सुळेंनी सांगितले
2
सुनिल केदारांनी महाविकास आघाडीचा विश्वासघात केला; ठाकरेंच्या भास्कर जाधवांची टीका
3
टी-२० मालिका : युवा भारतीयांची ‘कसोटी’, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध छाप पाडण्याची संधी
4
उद्धव ठाकरे यांची पंचसूत्री नव्हे तर थापासुत्री, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका
5
चॅम्पियन्स ट्रॉफी : पाकिस्तान हायब्रिड मॉडेलसाठी तयार, भारताचे सामने यूएईमध्ये रंगण्याची शक्यता
6
डब्ल्यूपीएल : हरमन, स्मृती, जेमिमा रिटेन
7
महाराष्ट्र को लुटेंगे, दोस्तोंको बाटेंगे हा भाजपचा अजेंडा, उद्धव ठाकरे यांचा घणाघात; सामान्य जनभावना या सरकारविरोधात
8
मला तो पक्ष नको, चिन्ह नको अजित पवारांना लखलाभो; सुप्रिया सुळेंनी बंडापूर्वी काय घडले ते सांगितले...
9
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या कारवर हल्ला; नांदेडच्या कंधार तालुक्यातील घटना
10
जम्मू काश्मीर: दहशतवाद्यांचा गावातील रक्षण समितीच्या सदस्यांवर हल्ला; दोघांची हत्या
11
नादाला लागू नका, यापुढे मराठा आरक्षणावर बोलू नका; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा
12
"एकदा संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही", राज ठाकरेंचे भावनिक आवाहन...
13
काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी; राष्ट्रवादीने दिली पोलीस आयुक्तांकडे तक्रार
15
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात
16
IPL 2025: KKRने केली मोठी चूक? रिलीज केलेल्या 'या' २ खेळाडूंनी केला 'सुपरहिट धमाका'
17
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
18
"राजसाहेब तुम्हाला खरंच बडव्यांनी घेरलंय, सावध रहा"; ठाकरे गटात गेलेल्या अखिल चित्रेंचा इशारा
19
AUS vs IND : 'ते' विसरा त्यांनी १५ वर्षांत स्वत:ला सिद्ध केलंय; कपिल देव यांची विराट-रोहितसाठी बॅटिंग
20
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?

भाजप सरकारला हद्दपार करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2018 12:29 AM

मागील चार वर्षात कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा असे म्हणण्याची वेळ आली असून, हे सरकार नको म्हणण्याची वेळ आली आहे.

ठळक मुद्देअशोक चव्हाण यांचे आवाहन मंठ्यातील जनसंघर्ष यात्रेत एल्गार

लोकमत न्यूज नेटवर्कमंठा : मागील चार वर्षात कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा असे म्हणण्याची वेळ आली असून, हे सरकार नको म्हणण्याची वेळ आली आहे. सर्वसामान्यांना वेठीस धरणाऱ्या भाजप सरकारला आगामी काळात त्यांची जागा दाखवून हद्दपार करा, असे आवाहन माजी मुख्यमंत्री तथा प्रदेश कॉगेसचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी मंठा येथे सोमवारी आयोजित केले.येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात काँग्रेसची जनसंघर्ष यात्रा पोहचली होती. यावेळी या यात्रेचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. या संघर्ष यात्रेचे नंतर जाहीर सभेत रूपांतर झाले यावेळी व्यासपीठावर ,माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री विजय वडीवेट्टीवार, रामप्रसाद बोराडे, रामकिसन ओझा, सुरेश देशमुख, जालना जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष सुरेशकुमार जेथलिया, माजी आ.धोडीराम राठोड, आर.आर. खडके ,भीमराव डोंगरे, तालुका कॉग्रेसचे निळकंठ वायाळ, शहराध्यक्ष शबाब कुरेशी, किसनराव मोरे ,नितीन जेथलिया आदींची उपस्थिती होती.पुढे बोलतांना अशोक चव्हाण म्हणाले की, हे सरकार प्रत्येक राजकिय कामासाठी समाजाचा वापर करत असुन सर्वसामान्यांना केवळ आश्वासनांवर झुलवत ठेवत आहे. आज राफेलचा मुद्दा असो की, सीबीआयचा गोंधळ यामुळे सरकारची छबी डगाळली आहे. राफेल प्रकरणात अद्यापही पंतप्रधान मोदींनी तोंड उघडले नसल्याचे चव्हाण म्हणाले.दिल्ली येथे भाजपाचे कार्यलय हे एका वर्षात होते आणि महापुरूषांचे पुतळे वषार्नुवर्षे रखडत असल्याचे शेवटी बोलतांना सांगितले. याप्रसंगी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, समाजातील सर्व घटक नाराज असून, जीएसटी मुळे व्यापारी उध्वस्त झाला. शेतकºयांना हमीभावाचे नुसते गाजर दाखवले. रूपया घसरला आहे. डिझेल, पेट्रोल महाग , राज्य सरकारकडे कर्मचाºयांना वेतन अयोग लागू करताना चालढकल केली जात असल्याचे चव्हाण म्हणाले. नोटाबंदीमुळे देशाची आर्थिक स्थिती कोलमडली आहे. दुष्काळ निवारणासाठी कुठलीच ठोस उपाययोजना सरकारने केली नसल्याचा आरोप ही चव्हाण यांनी केला.सरकार गोंधळून गेले असुन फक्त घोषणा करत फिरत आहेत. महागाई नियंत्रणात न आणल्याने सामान्य माणूस मेटाकुटीस आला आहे. कर्जमाफीच्या गोंधळावरही पृथ्वीराज चव्हाण यांनी टीका केली. उज्ज्वला गॅसची योजना म्हणजे मोठी फसवणूक आहे. आॅनलाईनच्या नावावर सरकारने शेतकºयांना फसवले आहे. धार्मिक धुर्वीकरण करत समाजात तेढ निर्माण करण्याची भावना सरकारची असल्याचेही पुथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले. यावेळी माजी मंत्री विजय वडीवेट्टीवार यांनीही सरकारच्या एकूणच धोरणांचा समाचार घेतला. तोफीक मुल्लानी यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी नागरिकांची उपस्थिती होती.

टॅग्स :JalanaजालनाAshok Chavanअशोक चव्हाणCongress Jan Sangharsh Yatraकाँग्रेस जनसंघर्ष यात्रा