शहरं
Join us  
Trending Stories
1
"खोटं बोल पण रेटून बोल ही महाडिकांची स्टाईल", लाडकी बहीण योजनेच्या वक्तव्यावरुन सतेज पाटलांचा हल्लाबोल
2
आजचे राशीभविष्य, १० नोव्हेंबर २०२४ : नोकरीत फायदा होईल, सांसारिक जीवनात सुख-शांती मिळेल
3
फुलंब्रीत प्लास्टिक साहित्य विक्रीच्या दुकानाला आग; तिघांचा मृत्यू, दोन जण गंभीर जखमी
4
कोणाला पाडायचे, निवडायचे याचे निरोप पोहोचले; जरांगे पाटील यांचा 'लोकमत'च्या मुलाखतीत दावा!
5
आमदार अशोक पवार यांच्या मुलाचे अपहरण; महिलेसोबत विवस्त्र व्हिडीओ करत १० कोटींची मागितली खंडणी
6
शिवाजी पार्कवर सभेला भाजप, अजित पवार, शिंदेसेनेला परवानगी; पण उद्धव-राज यांना नाही, कारण...
7
मोठी बातमी: वाडा-विक्रमगड मार्गावर ३ कोटी ७० लाख रुपये जप्त
8
ट्रक-खासगी बसची मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर धडक; आठ जण गंभीर
9
विशेष लेख: ज्या भाषेत बाहेर बोलता तीच भाषा घरी वापरता का..?
10
संकटकाळी ज्यांना मदत, त्यांनीच फाेडला पक्ष; शरद पवारांचा परळीतून धनंजय मुंडेंवर हल्लाबोल
11
मुंबईत प्रचाराच्या तोफा अद्याप थंडावलेल्याच; शेवटच्या आठवड्यात मात्र प्रचाराचा पारा चढणार!
12
दोन वर्षांच्या बालिकेची अत्याचार करून हत्या; विकृत सावत्र बापाचे निर्घृण कृत्य
13
हमास-इस्रायल युद्धात गाझाच्या ७० टक्के महिला, मुलांचा बळी गेला; युएनच्या अहवालामुळे खळबळ
14
एक बातमी अन् शेअर बनला रॉकेट; खरेदीसाठी लोकांची झुंबड, 2 दिवसात 44% ची तेजी
15
सत्ता डोक्यात गेलेल्यांचा पराभव करून परळीतील गुंडगिरी संपवा; शरद पवारांचा हल्लाबोल
16
महाराष्ट्रात ₹3000, झारखंडमध्ये किती? राहुल गांधींनी महिलांना दिलं मोठं निवडणूक आश्वासन!
17
आयसीसीला कळविले! टीम इंडिया चॅम्पिअन ट्रॉफीसाठी पाकिस्तानला जाणार नाही; पाकिस्तानींची जिरवली
18
“UPAने मनरेगा-अन्नसुरक्षा-RTI दिले, गॅरंटीची अंमलबजावणी केली, भाजपाने काय केले?”: खरगे
19
वेगळे पुस्तक छापून काँग्रसने संविधानाची थट्टा उडवली; नरेंद्र मोदींची घणाघाती टीका
20
"पृथ्वीवर यांच्यासारखा पक्ष नसेल"; जयंत पाटलांच्या टीकेवर तटकरे म्हणाले, "तुमचा करेक्ट कार्यक्रम..."

फडणवीस संपवा-संपवी खात्याचे मंत्री, त्यांनी धनगर-मराठा जाती संपवल्या: मनोज जरांगे

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2024 2:08 PM

देवेंद्र फडणवीस तुम्ही छगन भुजबळांच्या नादात सत्ता घालून बसणार: मनोज जरांगे

वडीगोद्री ( जालना) : धनगर आणि मराठा या दोन्ही जाती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संपवल्या,  आता फडणवीस हे संपवा संपवी खात्याचे मंत्री असायला हवेत. त्यांनी सगळ्यांचा कार्यक्रम केला, अशी खरमरीत टीका मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे पाटील यांनी  फडणवीसांवर केली. पश्चिम महाराष्ट्राचा दौरा आटपून जरांगे पाटील अंतरवाली सराटीत आल्यानंतर आज सकाळी त्यांनी पत्रकार परिषद घेतली यादरम्यान ते बोलत होते.

जरांगे पुढे म्हणाले, आरक्षण द्यायला बारा महिने लागत नाहीत. देवेंद्र फडणवीस तुम्ही छगन भुजबळांच्या नादात सत्ता घालून बसणार. आम्ही पूर्ण तयारीला लागलो पाडायचे की लढायचे आम्ही ठरवू पण तुमचा कार्यक्रम लावणार, असा इशारा देखील जरांगे यांनी सरकारला दिला. मराठ्यांना लढावं लागणार हे लक्षात घेतलं चांगल्या संख्येने मराठा समाज एक येत आहे. इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती १४ ते २० ऑगस्टपर्यंत होणार आहेत. राज्यातल्या सगळ्या मतदारसंघातील सर्वजाती धर्मातील लोकांनी डाटा घेऊन येणे आवश्यक आहे. कोणत्याही जातीचा असो, ज्यांना ज्यांना वाटतं की गोरगरिबांची सत्ता आली पाहिजे. त्यांनी यावं असे आवाहन जरांगे यांनी केले.

२९ ऑगस्टपर्यंत दिली मुदत यांनी पक्क ठरवलं की मराठ्यांना आरक्षण द्यायचं नाही. आजपासून पुन्हा २९ तारखेपर्यंत सरकारला पुन्हा वेळ दिला आम्हीच दिला मनाने आजपर्यंत सरसकट गून्हे मागे घ्यावे लागणार आहे. तुमचा खुर्चीत जीव आहे, आमचा आरक्षणात जीव आहे. त्यामुळे राजकीय भाषा वापरावीच लागेल ना, शंभूराजे तेव्हा आलते या विषयावर चर्चा झाली त्यानंतर झालीच नाही. आता २९ ऑगस्टला बघू उभा करायचे की पाडायचे. 

देवेंद्र फडणवीस जाणूनबुजून आरक्षण मिळू देत नाहीतशिंदे साहेब आरक्षण देतील  पण फडणवीस साहेब देऊ देत नाहीत, ते अजित पवारांना देखील बोलून देत नाहीत, ते बोलतही नाही. देवेंद्र फडणवीस जाणून बुजून मराठ्यांना आरक्षण मिळू देत नाहीत, असा आरोप जरांगे यांनी केला. तसेच मराठ्यात आणि ओबीसीत भांडण लावून दिले जात आहेत. ओबीसीतून आरक्षण देणार की नाही, हे सरकारने स्पष्ट करायला पाहिजे. गॅझेट आणायला तुम्हाला पैसे नाही, तर तुम्ही फक्त आकडा सांगा आम्ही एका दिवसात पैसे गोळा करून देतो, असे आवाहनही जरांगे यांनी केले.

लाडकी बहीण योजना  म्हणजे सावकारी खेळ आता समाज पहिल्या सारखा भोळा राहिलेला नाही. योजना द्यावी पण आता शंका येत आहे. कारण मतदान केलं तर बरं अन्यथा पैसे परत घेऊ, असं कुणीतरी बोलल आहे. हा मतदान विकत घेतल्यासारखा खेळ आहे. ही योजना म्हणजे सावकारी खेळ आहे. 

आम्ही दुप्पट पैसे देतो तुम्ही आरक्षण दिलं नाही तर मग आम्हाला तुम्हाला पाडावे लागणार. अधिवेशन, आचारसंहिता असा यांचा वेळकाढूपणा  सुरू आहे. मराठ्यांच आरक्षण कुणी घालवलं हे सगळ्यांना माहीत आहे. ते बैठकीला आले नाही म्हणून तेच तेच बोलणार का? फडणविस यांनी वाटोळे केले. राज्यातील चव्हाण, फडणवीस, राणे हे माजी मुख्यमंत्री माझ्या विरोधात आहेत. सरकारने ओबीसीतून आरक्षण द्यायचं की नाही याबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी. आम्हाला आता डायरेक्ट कृती हवी आहे. २९ ऑगस्टच्या आत निर्णय घ्या झेरॉक्स आणायला तुम्हाला आम्ही दुप्पट पैसे देतो हैद्राबाद करून सगळे पुरावे आणा. २९ तारखेला आमचा निर्णय होईपर्यत आरक्षणाबाबत निर्णय घ्या. यांना दंगली घडवून आणायच्या आहेत जर आमचं वाटोळे केलं तर यांना खुर्ची मिळवू देणारं नाही. कागदपत्र तयार ठेवावे, सगळ्यांनी सावध राहावे असेही जरांगे म्हणाले.

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षण