लोकमत न्यूज नेटवर्कभोकरदन : तालुक्यात गेल्या एक महिन्यापासून सुरू असलेल्या पावसाने तीन दिवसांपासून उघडीप दिली आहे. यामुळे आता पदरात कोणते पीक पडते, याचा शोध घेण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे.तालुक्यात अतिृवृष्टीमुळे शेतक-याच्या तोंडी आलेला घास वाया गेला आहे. त्यामुळे सर्वच शेतकरी अक्षरश: हाताश झाले आहेत. खरीप पिकांसाठी केलेला खर्च देखील वसूल होतो की, नाही? या चिंतेत शेतकरी आहेत. मागील तीन दिवसांपासून पावसाने उघडिप दिली आहे. परंतु, निराश होऊन घरात न बसता शेतकरी पुन्हा शेताकडे वळले आहेत. शेतातील अंकुर आलेली मका, सोयाबीन, बाजरी या पीकातुन आपल्या हाती काही लागते? याचा शोध घेत आहेत. नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करण्यात येत आहेत. मात्र, हातात काही पडेपर्यंत याचे काही खरे नसल्याचेही ग्रामस्थ सांगत आहेत.सोयाबीन, बाजरी पूर्ण हातची गेली आहे. मक्याच्या कणसांना सुद्ध कोंब फुटले आहेत. यामुळे दुसºया बाजून चांगलेल असलेल्या मक्याच्या कणसातून काही तरी हाती लागते का? याची शोधाशोध घेण्यासाठी शेतकरी कणसे उलट- पालट करित आहेत. तर काही ठिकाणी कणसे सोलण्यासाठी शेतकरी मजुरांना पाहत आहेत. ज्या शेतकऱ्यांनी पावसाअगोदर मका, सोयाबीनची सोंगणी करून गंज घातला होता. या गंजला अंकुर फुटले आहेत. बाजरीचे तर सर्वच पिक वाया गेले आहे. असे असताना शेतकरी रबी पिकांची तयारी करताना दिसून येत आहे. मात्र, अजून दहा- पंधरा दिवस शेतामध्ये वापसा होणार नसल्याचे चित्र आहे.
काय उरले पाहण्यात शेतकरी झाला गुंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 06, 2019 12:36 AM