लोकमत न्यूज नेटवर्कअंकुशनगर : अंबड तालुक्यातील महाकाळा, चुर्मापुरी परिसरात पाण्याच्या कमततेमुळे फळबागा वाळून गेल्या आहे. यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. हातावरील फोडाप्रमाणे जपलेल्या फळबागा डोळ्यासमोर वाळू लागल्याने शेतकरी चिंतेतआहेत.कमी पर्जन्यमानामुळे परिसरा शेतकऱ्यांच्या विहीरींनी मार्च महिन्यातच तळ गाठला यामुळे फळबागा जगविण्यासाठी शेतक-यांची मोठी कसरत करावी लागली. दोन अडीचमहिने कसेतरी बागांना पाणी दिले. मात्र, सध्या मे महिन्यात पाणी संपल्याने शेतक-यांच्या अडचणी वाढल्या आहेत. उन्हाचे चटके बसण्यास सुरुवात झाली होती. सध्या मे महिना सुरू असून तापमानात दिवसेंदिवस वाढ होत आहे. पाणीपातळी खालावल्याने सिंचनाचा बोजवारा उडाला आहे.वाढते तापमान आणि पाण्याची कमतरता यामुळे फळबागा कोमेजत आहे.अशा परिस्थितीत कृषी विभाग मात्र निद्रास्त असल्याचे निदर्शनास येते आहे. परिसरात फळबागांचे जिवापाड जतन करून भविष्याची स्वप्ने पाहणा-या शेतक-यांना या स्थितीत कृषी विभागाकडून उपाययोजनांचा सल्लाही मिळेनासा झाला आहे. त्यामुळे कृषी विभाग पांढरा हत्ती आहे काय,असा सवाल शेतक-यांकडून उपस्थित करण्यात येत आहे.पावसाळ्यात पर्जन्यमान कमी झाल्याने आधीच खरीप हंगामातील पिकांना फटका बसला. वेळेपूर्वीच खरीप हंगामातील कपाशी तसेच इतर पिके काढण्याची वेळ यावर्षी आली. सिंचनाची सुविधा असलेल्या शेतक-यांनी रब्बी पीक घेण्याचा प्रयत्न केला. पण पाण्याची पातळी खालावली असल्याने तसेच भारनियमनच्या अडचणीमुळे शेतकºयांना रब्बी हंगामातही नुकसानीला सामोरे जावे लागले. तरीही शेतक-यांनी न खचता शेतातील कामे सुरू ठेवली.अखेर शेतक-याकडे लिंबू, मोसंबी, संत्रा,पपई, केळी आदींच्या फळबागा पाण्याअभावी नष्ट होत आहेत.उन्हाची तीव्रता वाढत असल्याने फळबागा जगविण्यासाठी शेतक-यांची धडपड सुरू झाली आहे. शेतक-यांना फळबागांना पाणी देतांना अनेक अडचणी येत आहेत. यावर उपाय म्हणून अनेक शेतकरी आहे त्या फळबागांच्या झाडांच्या मुळाशी पालापाचोळा टाकून पाण्याची धूप थांबवत आहेत.
फळबागा वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची मोठी कसरत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2019 12:18 AM