शेतकऱ्यांनो घरात आर्थिक सुबत्ता नांदण्यासाठी काळानुरुप मानसिकता बदला – अजित पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2018 09:18 PM2018-01-24T21:18:05+5:302018-01-24T21:19:15+5:30

शेतकऱ्यांनो आपल्या घरात आर्थिक सुबत्ता नांदण्यासाठी काळानुरुप तुमची मानसिकता बदला.

Farmers Change Timely Mindset To Ensure Financial Support In The House - Ajit Pawar | शेतकऱ्यांनो घरात आर्थिक सुबत्ता नांदण्यासाठी काळानुरुप मानसिकता बदला – अजित पवार

शेतकऱ्यांनो घरात आर्थिक सुबत्ता नांदण्यासाठी काळानुरुप मानसिकता बदला – अजित पवार

Next

जालना - शेतकऱ्यांनो आपल्या घरात आर्थिक सुबत्ता नांदण्यासाठी काळानुरुप तुमची मानसिकता बदला. त्यासाठी लागणारी कोणतीही मदत करण्यास आम्ही तयार आहोत असे आश्वासन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घनसावंगीच्या जाहीर सभेत शेतकऱ्यांना दिले. लोकशाहीमध्ये कुणाला निवडून दयायचे हा अधिकार जनतेचा असतो. परंतु लोकशाहीमध्ये ज्यांना तुम्ही निवडून दिले त्यांनी आज काय अवस्था केली आहे. सरकार नुसत्या घोषणा करत आहे. कृती तर काहीच करत नाही असा आरोप करतानाच केंद्रात, राज्यात ते गल्लीपासून दिल्लीपर्यंत तुमचं सरकार असताना शेतकऱ्यांना दयायला पैसे का नाही असा सवालही सरकारला केला.

माझ्या शेतकऱ्याला, कामगाराला आणि सुशिक्षित वर्गालाही हे सरकार फसवत आहे. तुमचे आमचे खिसे कापण्याचा आणि लुटण्याचा प्रकार हे सरकार करत असून शेतकऱ्यांच्या,कष्टकऱ्यांच्या मुळावर उठलेल्या या सरकारला त्यांची जागा दाखवून देण्यासाठी सज्ज व्हा असे आवाहन अजितदादांनी केले.

प्रकल्पांना सुधारीत प्रशासकीय मान्यता देणे म्हणजेच भ्रष्टाचार नाही का ? - जयंत पाटील

आमच्या सरकारच्या काळात मोठमोठया धरण प्रकल्पांच्या किंमती वाढल्या म्हणून भ्रष्टाचार झाला असा शोध भाजपच्या लोकांनी लावला होता आणि खोटे आरोपही केले होते आणि आता त्यांच्याच राज्यात ३०७ प्रकल्पांना सुधारीत प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे मग हा भ्रष्टाचार नाही का असा सवाल विधानसभेतील गटनेते जयंत पाटील यांनी घनसावंगीच्या जाहीर सभेत सरकारला केला.

३०७ प्रकल्पांना सुधारीत प्रशासकीय मान्यता सरकारने दिली. ४० हजार कोटी रुपये सरकारने वाढवून दिले म्हणजे हा भ्रष्टाचार झाला आहे. जर मंत्रिमंडळाने या प्रकल्पांना मान्यता दिली असेल तर संपूर्ण मंत्रीमंडळ भ्रष्टाचारी आहे असा आरोप जयंत पाटील यांनी सभेत केला. सहकार,शिक्षण क्षेत्रामध्ये आदर्श काम स्वर्गीय अंकुशराव टोपेसाहेबांनी केले असून त्यांच्या कामाचा आदर्श त्यांचे चिरंजीव राजेशभैय्या करत आहेत असेही जयंत पाटील म्हणाले. सभेमध्ये विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांचेही भाषण झाले. त्यांनी सभेमध्ये या सरकारला खाली खेचण्यासाठी सज्ज व्हा असे आवाहन जनतेला केले.

साडेतीन वर्ष झाली तरी भाजप सरकारने दिलेली किमान आश्वासने पूर्ण होत नाहीत ही चिंतेची गोष्ट असल्याचे सांगतानाच आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने काढलेल्या हल्लाबोल आंदोलनातून या सरकारला खाली खेचूया असे आवाहन राजेश टोपे यांनी केले. सभेमध्ये महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, ओबीसी सेलचे अध्यक्ष ईश्वर बाळबुधे, प्रदीप सोळंके यांची भाषणे झाली. या सभेला विधीमंडळ पक्षनेते अजित पवार, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसेपाटील, माजी मंत्री व विधीमंडळ गटनेते जयंत पाटील, माजी मंत्री राजेश टोपे, महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, माजी खासदार गणेश दुधगावकर, आमदार जयदेव गायकवाड, आमदार अमरसिंह पंडीत, आमदार विक्रम काळे, आमदार सतिष चव्हाण, प्रदेश उपाध्यक्ष कादीर मौलाना, राष्ट्रवादी वक्ता सेलचे राज्यप्रमुख प्रदीप सोळंके, राष्ट्रवादी लीग सेलचे राज्यप्रमुख भगवानराव साळुंखे, ओबीसी सेलचे अध्यक्ष ईश्वर बाळबुधे, घनसावंगीच्या नगराध्यक्षा सौ.योजना देशमुख आदी उपस्थित होते

Web Title: Farmers Change Timely Mindset To Ensure Financial Support In The House - Ajit Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.