लोकमत न्यूज नेटवर्कजालना : शेतमाल तारण योजना शेतकºयांच्या हिताची योजना आहे. शेतक-यांनी शेतमाल तारण ठेवून त्याचा लाभ घेण्याचे आवाहन राज्यमंत्री तथा कृउबा समितीचे सभापती अर्जुन खोतकर यांनी केले. येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत शनिवारी शेतमाल तारण कर्ज योजनेचा शुभारंभ खोतकर यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी जि.प.अध्यक्ष अनिरूध्द खोतकर, उपसभापती भास्कर दानवे, संचालक रामेश्वर भांदरगे, विष्णू पवार सचिव गणेश चौगुले, अनिल सोनी, सभापती पांडुरंग डोंगरे, पंडित भुतेकर, संतोष मोहिते, मोहन राठोड आदी उपस्थित होते.जिल्ह्यात पावसाने दडी दिल्याने खरिपातील सर्वच पिके धोक्यात आहेत. सुरुवातीच्या पावसावर निघालेल्या उडीद, मुगाला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी हैराण झाले आहेत. शासनाने मुगाला हमी भाव जाहीर केला, मात्र अद्यापही केंद्र सुरु करण्यात आले नसल्याने शेतक-यांना कमी दराने मूग, उडीद विकावे लागत आहे. याचा शेतक-यांना आर्थिक फटका बसत असल्याचे खोतकर यांनी सांगितले. शेतक-यांची गैरसोय बघता शेतमाल तारण योजनेचा शुभारंभ करण्यात आल्याचे खोतकर म्हणाले. याचा जास्तीत जास्त शेतक-यांनी फायदा घ्यावा, असे खोतकर म्हणाले. यावेळी संचालक मंडळाचे पदाधिकारी, शेतक-यांची मोठ्या सख्येने उपस्थित होती.
शेतमाल तारण योजना शेतकऱ्यांच्या फायद्याची
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2018 12:46 AM