लोकमत न्यूज नेटवर्कजालना : पर्यावरणासह जमिनीचा पोत बिघडवणाºया एचटीबीटी या बंदी असलेल्या कपाशीच्या वाणाची लागवड करून रेवगाव येथील शेतकऱ्यांनी सकरकारच्या विरोधात एक प्रकारे गांधीगिरीच केली. ही माहिती कृषी विभागाला मिळताच जिल्हा गुणनियंत्रकांनी रेवगावला भेट देऊन शेतक-यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. तसेच त्या शेतक-यांनी आणलेल्या बियाणांचे नमुने घेऊन ते प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठवले असल्याचे सांगण्यात आले.शेतकरी संघटनेच्या वतीने रेवगाव येथील काही शेतक-यांना एकत्रित करून बंदी असलेले कपाशीचे एचबीटी हे वाण लावण्याचा प्रयत्न केला. तसेच एकीकडे बीटी तंत्रज्ञानात नवनवीन बदल होत असताना राज्य आणि केंद्र सरकार अशा तंत्रज्ञानाला परवानगी देत नसल्याने हे वाण आम्ही लावत असल्याचे शेतक-यांनी सांगितले. एक प्रातिनिधीक स्वरूपात शासनाचा निषेध करण्यासाठी म्हणून ही लागवड करण्यात आली. सोशल मीडियावर ही माहिती मिळताच जिल्हा गुण नियंत्रक एस.डी. गरांडे यांनी रेवगावला भेट देऊन शेतक-यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. बियाणांची चौकशी करून बंदी असलेले वाण पर्यावरणासह जमिनीचा पोत आणि मानवाच्या आरोग्यासही ते कसे घातक आहे, हे समजावून सांगितल्याचे गरांडे म्हणाले. यावेळी रेवगाव येथील शेतकरी आप्पासाहेब कदम, सुधीर शिंदे, प्रा. नारायण बोराडे, दत्ता कदम, रमेश खांडेभराड, शिवाजी लकडे, संजय सोळंके यांच्यासह सौमित्रा गोल्डे, रेणुका चोखनगळे, रंभाई गायकवाड, बालाजी शेळके, अर्जुन गोल्ड आदींची उपस्थिती होती.
बंदी असलेले बियाणे लावून शेतकऱ्यांची गांधीगिरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2019 12:25 AM