लोकमत न्यूज नेटवर्ककेदारखेडा : गतवर्षीच्या पीक विम्याच्या लाभापासून वंचीत असलेल्या शेतकºयांचा निधी व यादी केदारखेडा जिल्हा बँकेच्या शाखेत प्राप्त झाली आहे. मात्र सदरील निधी शेतकºयांच्या खात्यावर जमा करण्यासाठी पासबुक व आधार कार्डसह पीक विमा भरल्याची पावती मागितली जात आहे. शेतकºयांची ओळख म्हणून पासबुक व आधारची मागणी आवश्यक आहे. पंरतु, विमा भरणा केल्याची पावती मागवुन अडवणुक केल्या जात आहे.गतवर्षी शेतकºयांनी खरीपाच्या पीकांचा विमा उतरविला होता. त्यात बँकेसमोर रांगेत ताटकळत उभे राहण्यापेक्षा अनेक शेतकºयांनी सी.एस.सी केंद्रावर आॅनलाईन भरणा केला होता. गतवर्षी सदरील पीक विम्याच्या लाभापोटी शासनाने नुकसान भरपाई म्हणुन मंजुरी दिली. आणी याचा निधी सुध्दा तात्काळ बँकेत जमा करण्यात आला होता. पंरतु, हजारों शेतकºयांचा पीक विमा आलाच नव्हता. त्यावर अनेक शेतकºयांनी लेखी तक्रारी दाखल केल्या होत्या. अगोदरच्या शेतकºयांना पीक विम्याचा लाभ मिळवून सहा महिने उलटले आहे. त्यावेळी ओळखीच्या पुरव्याशिवाय कोणत्याही कागदपत्रांची मागणी शाखेत करण्यात आली नाही. आता एक तर सहा महिण्याच्या प्रतिक्षेनंतर या वंचीत शेतकºयांचा पीक विमा केदारखेडा जिल्हा बँकेच्या शाखेत जमा झाला आहे. तरी सदरील पैसे खात्यावर जमा करण्यासाठी पासबुक, आधारसह पीक विमा भरणा केलेल्या पावतीची मागणी केली जात आहे. या शाखेत ४७३ शेतकºयांचे १५ लक्ष ७७ हजार रुपये जमा झालेले असताना शेतकºयांच्या खात्यावर घेण्यासाठी पावतीची मागणी करुन शेतकºयांची अडवणुक केल्या जात आहे. होत असलेली अडवणूक तात्काळ थाबंविण्यात यावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे.
पावतीवरुन होतेय शेतकऱ्यांची अडवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2018 1:03 AM
गतवर्षीच्या पीक विम्याच्या लाभापासून वंचीत असलेल्या शेतकºयांचा निधी व यादी केदारखेडा जिल्हा बँकेच्या शाखेत प्राप्त झाली आहे. मात्र सदरील निधी शेतकºयांच्या खात्यावर जमा करण्यासाठी पासबुक व आधार कार्डसह पीक विमा भरल्याची पावती मागितली जात आहे. शेतकºयांची ओळख म्हणून पासबुक व आधारची मागणी आवश्यक आहे. पंरतु, विमा भरणा केल्याची पावती मागवुन अडवणुक केल्या जात आहे.
ठळक मुद्देकेदारखेडा : पीकविम्याच्या लाभापासुन वंचित