शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
6
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
7
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
8
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
9
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
10
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
11
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
12
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
13
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
14
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
15
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
16
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
17
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
18
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
19
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
20
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."

शेतकरी आॅफलाईन, प्रशासन आॅनलाईन तर मदत सलाईनवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2019 12:36 AM

शेतकऱ्यांच्या बँक खात्यासह अल्पभूधारक, अत्यल्पभूधारक, बहुभूधारक अशाप्रकारची नावासहित अद्यावत माहिती संकलित करून तातडीने संबंधित कार्यालयास सादर करायची असल्याने शेतकरी आॅफलाईन, प्रशासन आॅनलाईन, तर मदत सलाईनवर असल्याचे पाहावयास मिळत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्करामनगर : जालना तालुक्यातील रामनगरसह परिसरातील गावांमधील शेतकऱ्यांच्या बँक खात्यासह अल्पभूधारक, अत्यल्पभूधारक, बहुभूधारक अशाप्रकारची नावासहित अद्यावत माहिती संकलित करून तातडीने संबंधित कार्यालयास सादर करायची असल्याने शेतकरी आॅफलाईन, प्रशासन आॅनलाईन, तर मदत सलाईनवर असल्याचे चित्र सध्या तरी पाहावयास मिळत आहे.पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेसाठी फेब्रुवारी महिन्यातील दुस-या आठवड्यापासून सदरील माहिती संकलित करण्याच्या सूचना संबंधित तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायकांना वरिष्ठांकडून मिळालेल्या आहेत. अवघ्या दहा ते बारा दिवसांत हे काम संपवायचे असल्याने तसेच शासनस्तरावरून नवीन सूचना येत असल्याने तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायक यांच्यावरील कामाचा ताण वाढला आहे. तसे पाहता दोन ते तीन वर्षापासून शेतक-यांना मिळणारी मदत थेट त्यांच्या बँक खात्यात जमा होते. परंतू, बहुतांश लाभार्थी शेतक-यांनी बँकेकडे खेटे मारावे लागतात. ते आयएफएससी कोड तसेच खाते क्रमांक चुकल्यामुळे या चुका वारंवार होत असल्याने शेतकरी सातत्याने आधार क्रमांक आणि बँक पासबुक सत्यप्रती महसूल तसेच कृषी विभागाकडे जमा करत आहे.यावर्षी सुरूवातीपासून जेमतेम पाऊस पडला. खरीप हंगाम कसाबसा आला, रबी हंगाम हातचा गेला. मात्र, अद्यापही कसलीही ठोस आर्थिक मदत शेतक-यांना मिळाली नसल्याचे वडीवाडी येथील सरपंच ज्ञानेश्वर सोनवणे तसेच खणेपुरी येथील प्रगतशील शेतकरी सोपानराव बाबर यांनी सांगितले.यामुळे शेतकरी फक्त आॅफलाईनवर असून त्याला मिळणारी मदत मात्र, सलाईनवर असल्याचे जाणवते.

टॅग्स :government schemeसरकारी योजनाFarmerशेतकरीBanking Sectorबँकिंग क्षेत्र