दरम्यान रासायनिक आणि मिश्र खतांचा मुबलक पुरवठा व्हावा या हेतूने नियोजन करण्यात आले आहे. सध्या जिल्ह्यात उपलब्ध असलेला खतांचा साठा युरिया ३६ हजार ८४३ मेट्रिक टन, डीएपी ३५३३, एसएसपी. ५,६८३ मेट्रिक टन उपलब्ध आहेत. तसेच युरियाचा ५६,२९० मेट्रिक टन साठा हा तालुका पातळीवर वितरित करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
चौकट
१ हजार ६०० कोटींचे पीक कर्ज
जालना जिल्ह्याला यंदा १ हजार ६०० कोटींचे पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून, काही बँकांनी ते वाटप सुरू केले आहे. त्यात शेतकऱ्यांची बँक म्हणून जिल्हा मध्यवर्ती बँकेस १२५ कोटी रूपयांचे उद्दिष्ट दिले होते. त्यातील ३९ कोटी रूपयांचे वाटप करण्यात आले आहे. त्यातच ज्या शेतकरी सभासदांनी त्यांच्या जमिनीच्या क्षेत्रानुसार घेतलेले जुने पीक कर्ज ३१ मार्चपूर्वी भरले आहे. अशांना मध्यवर्ती बँक दहा टक्के वाढीव पीक कर्ज देत असल्याची माहिती बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आशुतोष देशमुख यांनी दिली.