तहसीलदार नरेंद्र देशमुख ; खापरदेव हिवरा येथे मत्स्यपालनाविषयी मार्गदर्शन
जालना : मागील दोन वर्षांपासून तालुक्यात जोरदार पाऊस पडत आहे. त्यामुळे मुबलक पाणीसाठा राहत असून, शेतक-यांनी शेतीला जोडधंदा म्हणून मत्स्य व्यवसाय करावा, असे आवाहन तहसीलदार नरेंद्र देशमुख यांनी केले.
घनसावंगी तालुक्यातील खापरदेव हिवरा येथे मत्स्यपालन याविषयी मार्गदर्शन शिबिराचे शुक्रवारी आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ते बोलत होते. पुढे बोलताना तहसीलदार देशमुख म्हणाले की, मत्स्यबीज निवडतांना किमान दीड ते दोन इंचाचे निवडावे. मत्स्यबीज जुलै किंवा ऑगस्ट महिन्यात शेततळ-यात टाकावे, यामुळे त्याचा विक्रीसाठी फायदा होईल, असे सांगून मत्स्यपालन करताना येणा-या अडचणी, प्रोटीन फील्ड, वजन वाढवणे आदी विषयांवर देशमुख यांनी मार्गदर्शन केले. त्यानंतर तालुका कृषी अधिकारी राम रोडगे यांनी पोखराअंतर्गत असलेल्या विविध योजनांची माहिती दिली. याप्रसंगी प्रशांत मरकड, संतोष खेरुडकर, अविनाश भुतेकर, तलाठी एस नरवटे, कृषी सहायक ही. रेंगे, शेतकरी दीपक परदेशी, रामभाऊ परदेशी, श्रीरंग रोडे, बंडू झाकणे, पांडुरंग गिरे, एकनाथ कराडकर, भगवान रोडे, अर्जुनसिंग परदेशी, विठ्ठल गिरे, भीमराव रोडे, युवराज येवले, मच्छिंद्र परदेशी, सुनील कोरडे, किसन यसलोटे, वैभव परदेशी आदींची उपस्थिती होती.